Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Sabala Scheme Anudan shasan Nirnay ] : एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत किशोरवयीन मुलींकरीता योजना ( सबला ) ह्या केंद्र पुरस्कृत योजनाकरीता निधींचे वितरण व खर्च करण्यास मान्यता देणेबाबत , राज्य शासनांच्या महिला व बाल विकास विभागांकडून दिनांक 05 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रम मार्फत किशोरवयीन मुलींकरीता योजना ( सबला ) या केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत लाभार्थ्यांना पुरविण्यात आलेल्य पोषण आहाराची देयके अदा करण्याकरीता केंद्र व राज्य हिस्सा 50:50 प्रमाणात वितरीत करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती .
सदर शासन निर्णयानुसार महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रमा खाली किशोरवयीन मुलींकरीता योजना ( सबला ) या केंद्र पुरस्कृत योजना करीता केंद्र व राज्य हिश्यासाठी एकुण 11.0992 कोटी ( अक्षरी – अकारा कोटी नऊ लाख ब्याण्णव हजार रुपये फक्त ) इतका निधी वितरीत व खर्च करण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहेत .
सदरचा निधी हा पोषण आहार , पोषक अन्न व पेये यांचे वितरण , विशेष पोषण आहार कार्यक्रम , किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण , किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणाकरीता राजीव गांधी योजना , सहाय्यक अनुदाने , किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणाकरीता योजना ( सबला ) , सहायक अनुदाने या लेखाशिर्ष खाली निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
या संदर्भात महिला व बाल विकास विभागांकडून दिनांक 05 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..