लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन , वार्षिक वेतनवाढ तसेच महागाई भत्ता थकबाकी संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक कार्यालय वेतन पथक बुलडाणा यांच्याकडून दि.14.07.2023 निर्गमित करण्यात आलेला आहे , यामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , माहे जुलै 2023 च्या वेतनाबाबत देयके सादर करणे संदर्भात विविध सुचना देण्यात आलेल्या आहेत .
वार्षिक वेतनवाढ : सदर परिपत्रकांमध्ये नमदु करण्यात आलेले आहेत कि , ज्या कर्मचाऱ्यांना माहे जुलै मध्ये वार्षिक वेतनवाढ लागु आहे , अशा कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लावून शालार्थ प्रणालीमध्ये नमुद करुन फॉरवर्ड करण्यात यावेत अशा सुचना संबंधित कार्यालय प्रमुखांना देण्यात आलेल्या आहेत . शिवाय ज्यांना वार्षिक वेतनवाढ लागु करण्यात आलेली नाही , त्याबाबत सबळ कारणासह ठराव जोडण्यात यावेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत .
तसेच माहे जानेवारी 2023 ते जुन 2023 पर्यंतचे 4 टक्के महागाई भत्ता फरकाचे थकबाकी रक्कमेसह माहे जानेवारी 2023 ते मे 2023 पर्यंतचे 4 टक्के महागाई भत्ता फरकाचे थकबाकी रक्कमेसह देयके सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .तसेच माहे जानेवारी व फेब्रुवारी 2023 चे वेतन अदा झालेले नाही त्यांनी मार्च 2023 ते मे 2023 या तीन महिन्यांचा महागाई भत्ता फरक समाविष्ट करावा , तसे फरकाचे विवरण पत्र वेतन बिलासोबत जोडावेत .



तसेच अनुदानिवरील ज्या शाळांमध्ये 20% ,40 % , 60% असे वेगवेगळे वेतन घेणारे कर्मचारी आहेत , अशा शाळा / क.म. वि यांनी 20 टक्के कर्मचाऱ्यांचे वेगळे 40 टक्के कर्मचाऱ्यांचे वेगळे व 60 टक्के कर्मचाऱ्यांचे असे वेगवेगळे देयके सादर करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी ,तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतन धारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ केवळ विशिष्ट पदांनाच ; इतर पदांना वेगळे नियम !
- यापुढे आता केंद्र सरकारकडून सेंद्रिय शेतीमाल करीता नवी प्रणाली लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- नदीजोड प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर मराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना मिळणार लाभ !
- रजा प्रवास सवलत अंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची सुविधा ; या सार्वजनिक वाहनातुन करता येणार मोफत प्रवास !
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38 टक्के तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !