Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Women Employee Niyamavali Pustika ] : नोकरदार महिलांच्या सुरक्षा तसेच अधिकारी , हक्क इ. बाबतचे अत्यंत उपयुक्त कायदे – नियमावली बाबत ,महाराष्ट्र राज्य महिला आयोग , मुंबई मार्फत महत्वपुर्ण नियमावली पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे , या संदर्भातील सविस्तर पुस्तिका पुढीलप्रमाणे पाहुयात ..

कामगार कायदा 1948 नुसार : कामाच्या प्रत्येक ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणात महिला व पुरुषांसाठी वेगवेगळी शौचालये आणि मुताऱ्या असणे गरजेचे आहे . तसेच धोकादायक काम असणाऱ्या ठिकाणी महिलांना कामावर घेण्यासंदर्भात कारखाने कायदा 1948 च्या कायद्याने बंदी केलेली आहे . तसेच कामाच्या ठिकाणी महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी वेगळे कपडे वा अन्य गोष्टी धुण्यासाठी जागा आवश्यक आहे , शिवाय तेथे स्नानगृहही असणे आवश्यक असेल .

ज्या ठिकाणी 30 पेक्षा अधिक महिला कार्यरत असतील त्या ठिकाणी कामगारांच्या मुलांसाठी म्हणून शिशुगृह आवश्यक असेल . ज्यामुळे कामगारांच्या मुलांसाठी तेथे सुरक्षित ठेवता येईल . सन 1948 मध्ये नमुद केल्याप्रमाणे महिलांना रात्रपाळी नाकारली होती , मात्र आधुनिक काळांचा विचार केला असता उद्योगांमध्ये सुरक्षतेच्या हमीसह महिला कामगारांना रात्रपाळीत काम करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे .

कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ कायदा 2013 : या कायद्यानुसार लैंगिक अत्याचाराची व्याख्या अशी आहे कि , जेव्हा एखादी व्यक्ती बोलून , न बोलता कृतीने किंवा स्पर्शाने , लैंगिक अर्थाने ओतप्रोत कृत्य अथवा लैंगिक उद्देशाने एखाद्या महिलेला त्रास देते , ज्यामुळे त्या महिलेला मानसिक धक्का बसतो , तेव्हा त्यास लैंगिक छळणूक होते आहे असे समजले जाते . अर्थार्जन करणार्या स्त्रियांना नोकरीच्या ठिकाणी सन कराव्या लागणाऱ्या लैंगिक छळास थोशप Sexual Hrrassment Work Place महिलांचे व्यावसायिक कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण अशी व्याख्या आहे .

स्त्रीच्या मनाविरुद्ध करण्यात आलेली कोणतीही शारीरिक जवळीकीचा प्रयत्न हा लैंगिक शोषण या सदरात मोडला जातो . तसेच कार्यालयातील कोणतीही व्यक्ती महिलांवर अन्याय करत असेल तर त्या व्यक्तीविरोधात हा कायदा वापरता येतो . कार्यालयीन प्रमुख , सहकारी , कनिष्ठ कर्मचारी , ऑफीसमध्ये कामाला असलेली कोणीही व्यक्ती जर कोणत्याही प्रकारे महिलेचा छळ करत असेल , तर अन्याय होणारी महिला त्या कार्यालयात असणाऱ्या महिला तक्रार निवारण समितीकडे अर्ज करु शकते .

 महिलांसमोर लैंगिकता दाखवणारी घाणेरडी चित्रे पाहणे , अश्लिल विनोद करणे , त्यांच्याकडे बघून विचित्र हावभाव करणे ,त्याच्या दिसण्यावरुन , पोषाखावरुन भाष्य करणे , दोन अर्थाने बोलणे , मानसिकता बिघडेल अशा प्रकारचे वर्तन करणे , महिलांना मान खाली घालयला लावेल अथवा बैचैन होईल , असे वर्तन करणे हे सर्वच प्रकार लैंगिक शोषणांमध्ये मोडतात .

लैंगिक शोषणाने पीडीत कर्मचारी काय करु शकतात ? : पहिल्यांदा या सर्व प्रकाराबद्दल कार्यालयातल्या सहकाऱ्यांशी बोलावेत , तसेच आस्थापनेत बोलावेत , त्यांना सत्य काय आहे त्याबद्दल सांगावेत , त्यांचा पाठिंबा मिळाला तर त्यांनाही गैरवर्तनाबद्दल राग आहे हे तुमच्या लक्षात येईल . छळवणुकीचा प्रकार घडत असताना कोणत्याही परिस्थितीत गाफील राहू नका आणि गोंधळून जाऊ नयेत . काही वेळेस गोंधळल्यासारखे होत असेल तेव्हा सद्सद्विवेकबुद्धीचा वार करावेत . काही वेळेसे घटना घडत असताना इतर व्यक्ती समोर असतील तर त्यांना साक्षीदार करावेत . काही प्रसंगात वैद्यकीय तपासणीची आवश्यकता असेल तर लागलीच करावेत .

या संदर्भात महाराष्ट्र राज्य महिला आयोग , मुंबई मार्फत निर्गमित करण्यात आलेले सविस्तर माहिती पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .

माहिती पुस्तिका (PDF)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *