Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Working Women Law , Adhiniyam 2013 ] : कामाच्या ठिकाणी स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात लैंगिक छळ होत असल्याचे , दिसून आल्याने सरकारकडून पुन्हा एकदा स्त्रियांच्या संरक्षणांसाठी सन 2013 मध्ये सुधारित अनिधियम लागु करण्यात आलेले आहेत . यानुसार कामाच्या ठिकाणी कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळाले आहेत . या नुसार कंपनी / कार्यालये / आस्थापना कामाच्या ठिकाणी कोणत्या बाबी राबविणे आवश्यक आहेत . या बाबतचे नियम पुढीलप्रमाणे पाहुयात ..

यांमध्ये प्रत्येक आस्थापनेने कार्यालयांत पुरुषांच्या बरोबरीने न्याय देणे महत्वाचे आहे . तसेच कार्यालयात असणाऱ्या महिलांना सर्वप्रथम सुरक्षिता आणि काम करावयास चांगले निकोप वातावरण देणे आस्थापनेच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहेत . तसेच कार्यालयांमध्ये एखाद्या व्यक्तीचे अयोग्य वर्तन असल्यास तर त्याला समज देणे गरजेचे आहे . हे त्य कंपनीच्या आस्थापनेवार प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरु शकतील .

तसेच कार्यालयात निरोगी आणि निकोप वातावरण नसेल अशा वेळी कर्मचारी सातत्याने चिंतेत असू शकेल . त्यामुळे पोषक वातावरण देणे आवश्यक आहेत . कार्यालयांमध्ये एखाद्या महिलेची तक्रार असल्यास तर ही तक्रार निवारण समितीकडे योग्य प्रकारे नोंदवून घेणे महत्वपुर्ण ठरते . तक्रारदाराची तक्रार समजून घेवून कार्यालयातील थट्टेचा विषय होवू नये याची काळजी घेतली पाहीजे .सुसंवाद हाच कंपनीचा आणि वैयक्तिक प्रगतीचा पाया आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे .

कर्मचाऱ्यांनी स्वत : होवून कार्यालयांमध्ये काही नियम पाळणे गरजेचे ठरते : कामाच्या ठिकाणी सहकार्याने वागणे , कामाच्या ठिकाणी मैत्रीपुर्ण वातावरण ठेवणे , मात्र त्यातही जास्त अघळपघळपणा येवू देवू नये . प्रत्येकांकडे वेगवेगळी कौशल्य असतात त्यांचा सदोदित आदर करणे , कौतुकाचे चार शब्द काढले नाहीत तरी चालतील पण कुणाला दुखवू नयेत , आपला मुद्दा हा योग्य शब्दांत सांगता आला पाहिजे .

अन्याय थांबविण्यासाठी पुढील बाबींचा विचार होणे आवश्यक : यांमध्ये लैंगिक शोषण खरोखरीच होत आहेत का हे प्रथम तपासून घेणे होत असल्यास ते कशा प्रकारे होत आहेत त्याबद्दल माहिती घेणे .एखाद्या सहकार्यांचे वागणे खूपच अघळपघळ आहे का ? , अशा प्रकारच्या वागण्याला माहे अनुमोदन आहे का ? , वागणे काहीसे विचित्र वाटते का ? वागण्याचा मानसिक त्रास होतोय का ? अशा प्रकारचे स्वत : प्रश्न विचारा . यांमध्ये तुमचा काही दोष नाही असे वाटत नसल्यास , हे वेगळे आणि त्रासदायक वागणे किरकोळीत घेवू नयेत , याबाबत योग्य कार्यवाहीसाठी वरिष्ठांशी सहकार्य करावेत ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *