Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Working hours of employees, overtime pay, new law against workplace harassment ] : खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कामाचे तास अतिरिक्त ( Over time ) कामाचा मोबदला , कामाचे तास त्याचबरोबर ऑफिसमधील होणाऱ्या छळाच्या विरोधात नवीन कायदा लागू करण्याकरिता केंद्र सरकारकडे तृणमूल काँग्रेसचे खासदार संकेत गोखले यांनी अधिवेशन दरम्यान प्रस्ताव मांडला आहे .

अतिरिक्त कामाचा मोबदला : खाजगी क्षेत्रामध्ये नोकरीचे हमी नसते तरीदेखील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या अतिरिक्त कामाचा मोबदला दिला जात नाही . अनेक वेळा कर्मचाऱ्यांकडून 10 ते 12 तास काम करून घेतले जाते , त्या बदल्यात हवा तसा मोबदला दिला जात नसल्याने , खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो .

कामगार कायद्यानुसार आठ तास काम त्यानंतरचे काम हे ओव्हरटाईम /  अतिरिक्त कामाचे तास म्हणून ग्राह्य धरले जाते . सदर अतिरिक्त कामाच्या तासाचा मोबदला देण्याची तरतूद आहे ,  तरी देखील अनेक ठिकाणी ओव्हर टाईमचा मोबदला दिला जात नाही . यासाठी कडक नियमावली तयार करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मांडण्यात आला आहे .

मानसिक छळ : खाजगी क्षेत्रामध्ये कामगारावर वर्कलोड जास्त दिले जाते , यामुळे कामगारांची मानसिक छळ मोठ्या प्रमाणात होते . अशा प्रकारच्या मानसिक छळामुळेच अनेक कामगारांना मानसिक आजार जडतात .

सदरच्या प्रस्तावावर केंद्र सरकारकडून , कोणत्या प्रकारच्या नियमावली तयार केले जातील , याकडे आता खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *