Good News : वेतनत्रुटी निवारण समितीचे कामकाम पुर्ण ; शासन निर्णय निर्गमित दि.02.01.2025

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Work of Pay Error Redressal Committee completed ] : सातव्या वेतन आयोगानुसार ज्या पदांच्या वेतनांमध्ये त्रुटी आढळून आलेल्या होत्या अशा पदांच्या वेतनत्रुटींमध्ये सुधारणा करणेबाबत , राज्य शासनांकडून गठीत करण्यात आलेल्या समितीचे कामकाज पुर्ण झाले आहेत , याबाबत सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 02 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या शासन आदेशानुसार , नमुद करण्यात आलेले आहेत कि , सातव्या वेनत आयोगातील त्रुटींबाबत , विविध न्यायालयातील दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करुन त्या बाबत शिफारशी करण्याकरीता वेतनत्रुटी निवारण समिती , 2024 ची स्थापना करण्यात आली आहे .

सदर समितीच्या कामकाजाकरीता मंत्रालयीन संवर्गातील कक्ष अधिकारी , सहायक कक्ष अधिकारी व लिपिक – टंकलेखक पदांचे तीन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा 06 महिने किंवा समिती आपला अहवाल शासनास सादर करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्परत्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आलेल्या होत्या ..

आता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 चे कामकाज पुर्ण झाले असल्याने , सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवा दिनांक 01.01.2025 पासून त्यांच्या मूळ विभागास परत करण्यात येत आहेत . याबाबतचा सविस्तर शासन आदेश खालीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment