महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ women employee imp shasan Nirnay ] : महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून , दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार , वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती करिता विवाहित असणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्याला तिच्यावर अवलंबून असणाऱ्या किंवा तिच्याबरोबर राहत असलेल्या तिच्या आई-वडिलांचे किंवा तिच्या सासू-सासर्‍यांची निवड करणेबाबत महत्वपूर्ण निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी विवाहच्या नंतर तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या आणि तिच्याबरोबर राहात असणाऱ्या सासू-सासरे किंवा आई वडील या दोघांपैकी एकाची वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती करिता निवड केली आहे . अशा प्रकारचे लेखी अर्जाद्वारे ती कार्यरत असणाऱ्या कारणे प्रमुखास कळवणे बंधनकारक असणार आहे . यासंदर्भात पुरावा सादर करणे आवश्यक असणार आहे , तसेच त्याबाबतची सेवा पुस्तकामध्ये नोंद घेणे आवश्यक असेल . तर अविवाहित महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विकल्पाची नोंद घेण्याची आवश्यकता नसणार आहे .

सदर महिला कर्मचाऱ्यांनी वर नमूद केल्याप्रमाणे , एकाची निवड केल्याच्या नंतर तिला संपूर्ण सेवा कालावधीमध्ये सदर विकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही . तसेच महिला कर्मचारी शासन सेवेमध्ये नव्याने तसेच बदलीने रुजू होते वेळी , संबंधित आस्थापना अधिकारी यांनी सदर नोंदी निदर्शनास आल्याच्या लेखी नोंद सेवा पुस्तकांमध्ये दिनांक सहित घेण्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

सदर शासन निर्णय दिनांक 02 ऑगस्ट 2024 पूर्वी विवाहित सरकारी महीला कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या निर्णय घेण्यात आलेल्या प्रकरणात लागू राहणार नसल्याचे किंवा निर्मित ठरलेल्या प्रकरणी पुन्हा सुरू करण्यात येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment