Spread the love

Live Marathipepar [ Ram Mandir Temple Denagi , Indian Actror ] : राम मंदीर निर्माणचे काम दोन वर्षांपासून सुरु झालेले आहेत . या श्रीराम मंदीराच्या निर्माणासाठी भारतामधून नव्हे तर विदेशांमधून देखिल मोठी देणगी देण्यात आलेली आहे . यांमध्ये भारतातील कोणकोणत्या अभिनेत्यानी देणग्या दिलेल्या आहेत , व सर्वात मोठी रक्कम कोणी दिली याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .

राम मंदीर निर्माणासाठी आत्तापर्यंत 1100 करोड रुपये इतका खर्च आलेला आहे , अजूनही 500 करोड पर्यंत खर्च येईल . हा खर्च देणगीमधूनच पुर्ण होत असल्याची माहिती समोर येत आहे . राम मंदीर ट्रस्टला आतापर्यंत मोठी रक्कम देणगी स्वरुपात मिळत असून , यांमध्ये भारतीय अभिनेते , व्यापारी लोक तसेच अध्यात्मिक लोकांची देणगी मोठ्या प्रमाणात आहे .

भारतांमध्ये देणगी देण्यामध्ये अक्षय कुमार हा अभिनेता नेहमीच अग्रेसर असतो . अक्षय कुमारने लॉकडाऊनच्या काळांमध्ये सरकारला तब्बल 25 करोड इतकी देणगी दिलेली होती . तर अक्षर कुमारने सन 2021 मध्ये मोठी रक्कम राम मंदीर निर्माण साठी दिलेली असून , रक्कम जाहीर न करण्याचे त्यांनी सांगितले होते . यामुळे त्यांनी दिलेली रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही .

त्यापाठोपाठ अनुपम खैर यांनी ऑक्टोंबर महिन्यांत अयोध्या दौरा केला होता , त्यानंतर त्यांनी मोठी रक्कम राम मंदीर निर्माण साठी देणगी दिलेली होती . त्यांची रक्कम देखिल जाहीर करण्यात आलेली नाही .शक्तिमान मालिकेमध्ये काम केलेले मुकेश खन्ना यांनी राम मंदीर साठी 1.1 लाख रुपयांची देणगी दिलेली आहे . तर साऊथ अभिनेता / राजनेता पवन कल्याण यांनी राम मंदीर निर्माण साठी 30 लाख रुपयांचे योगदान दिलेले आहेत .

तसेच हेमा मालिनी , मनोज जोशी यांनी देखिल राम मंदीर साठी योगदान दिलेले आहेत . नविन रामायण ची मालिकेमध्ये रामाचे रोल करणारे गुरमीत चौधरी यांनी देखिल राम मंदीर साठी मोठी रक्कमेचे योगदान दिलेले आहेत .त्यानंतर अमिताभ बच्चन , आलिया भट्ट , रणबीर कपुर , माधुरी , कॅटरीना , विक्की कौशल्य अशा दिग्गज अभिनेत्यांनी राम मंदीरासाठी योगदान दिलेले आहेत .

या गुजराती अध्यामिक गुरुनी दिली सर्वात मोठी रक्कम देणगी : मोरारी बापू हे भारतीय अध्यात्मिक नेते आणि गुजरात मधील रामकथेचे विदेक आहेत . आत्तापर्यंत त्यांनी रामकथेचे 900 पेक्षा अधिक कथांचे पठण केलेले आहेत . रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या संकेतस्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार , त्यानी 11.30 कोटी इतकी सर्वात मोठी रक्कम देणगी स्वरुपात दिलेली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *