Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Which party will get which accounts in Mahayuti? ] : महायुती मध्ये कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार या संदर्भात आताच्या घडीची मोठी अपडेट समोर येत आहे , सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेवूयात ..
सध्या मंत्रिपद न दिल्याने छगन भुजबळ , सुधीर मुनगुंटीवार हे आक्रमक भूमिका घेत आहेत . तर देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना राज्यसभेत सदस्यासाठी संधी देऊ , असे आश्वासन दिली आहे . परंतु यावर छगन भुजबळ सहमत नसल्याचे , दिसून येत आहे . सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार ? या संदर्भात सूत्राकडून महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली आहे .
अजित पवार गटाला कोणती खाती मिळणार ? : प्राप्त माहितीनुसार मकरंद पाटील यांना सहकार खाते , अजित पवार यांना अर्थ व नियोजन खाते , अदिती तटकरे यांना महिला व बालकल्याण , तर दत्तामामा भरणे यांना कृषी खाते , हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण खाते , तर धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा खाते मिळण्याची शक्यता आहे .
भाजपाला कोणती खाती मिळणार ? : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीकडे ऊर्जा , पर्यटन , सार्वजनिक बांधकाम , महसूल व गृह खाते असणार आहेत . यापैकी गृह खाते देवेंद्र फडणवीस हे स्वतःकडे ठेवतील अशी चर्चा आहे .
शिवसेना शिंदे गटाकडे कोणती खाती येणार ? : प्राप्त माहितीनुसार , शिवसेना शिंदे गटाकडे नगर विकास खाते , गृहनिर्माण त्याचबरोबर वनविभाग हे खाते शिंदे गटाकडे राहतील अशी माहिती देण्यात आली आहे . यामध्ये नगर विकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे राहील अशी चर्चा आहे .