Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Whatsapp parallel Apps Samvad Apps ] : व्हॉट्सॲपला पर्यायी ॲप्स म्हणून भारताच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स कडून नविन संवाद ॲप्स तयार करण्यात आलेले आहेत . हे ॲप्स लोकप्रिय व्हॉट्स ॲपला पर्यायी ॲप्स म्हणून काम करणार आहे . हे ॲप्स सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स कंपनीच्या अधिकृत्त संकेतस्थळावरुन नुकतेच पब्लिश करण्यात आलेले आहेत .
भारतांमध्ये व्हॉट्स ॲपचा वापर करणारे सर्वाधिक लोक आहेत , चीन हे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा देश असला तरी , चीन मध्ये भारतापेक्षा कमी व्हॉट्सॲपचा वापर करणारे आहेत . सध्या जगांमध्ये 2.7 अब्ज पेक्षा अधिक लोक या ॲपचा वापर करतात , तर 53 कोटी पेक्षा अधिक व्हॉट्स ॲपचे वापरकर्ते हे भारतीय आहेत . म्हणजेच सर्वाधिक वापरकर्ते हे भारतीय आहेत .
या ॲपला टक्कर देण्यासाठी भारतीय स्वदेशी संवाद हे ॲप्स सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स मार्फत विकसित करण्यात येत आहेत . या ॲप्सने सर्व प्रकारच्या सुरक्षितेच्या सर्व टप्पे ओलांडले आहेत . ह्या ॲप्सला TAL (Trust Assurance Level ) 4 ने मान्यता देखिल दिलेली आहे . सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स या संस्थेने याचे नाव संवाद असे ठेवण्यात आलेले आहेत , या ॲप्सचा Ios तसेच Android अशा दोन्ही प्लेटफॉर्मवर वार करता येणार आहेत .
सध्या संवाद या ॲप्सचे वेब व्हर्जन सुरु आहेत , याचे अधिकृत्त ॲप्स अद्याप लाँच झालेले नाहीत , या संवाद ॲप्सचे वेब व्हर्जन एक्सेस करण्यासाठी CDoT च्या अधिकृत्त संकेतस्थळावर एक्सेस करु शकता . याकरीता आपणांस साईनअप करावे लागेल . या ॲप्समध्ये Whatsapp मधील सर्व प्रकारचे फिचर्स पाहयला मिळणार आहेत , चीन या देशांमध्ये देखिल व्हॉट्सॲप अनेक पर्यायी ॲप्स आहेत . चीन मध्ये पर्यायी ॲप्सचा अधिक वापर करतात ..