Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ cebtral government budget whats for agriculture & Farmer ] : देशाचे अर्थसंकल्प दिनांक 23 जुलै 2024 रोजी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीताराम यांच्याकडून सादर करण्यात आली आहे . या अर्थसंकल्पामध्ये देशातील कृषी क्षेत्रासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांना नेमक्या कोणत्या तरतुदी लागू करण्यात आले आहेत . ते सविस्तरपणे या लेखांमध्ये जाणून घेऊयात .

या बजेटमध्ये कृषी तसेच शेतीपूरक क्षेत्राकरिता 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून करण्यात आली आहे . त्याचबरोबर देशातील तब्बल 20 लाख तरुणांना रोजगार देण्याकरिता तरतूद करण्यात आलेली आहे . कृषी क्षेत्रामध्ये 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद नेमके कोणत्या बाबी  करिता करण्यात आली ते पुढील प्रमाणे पाहुयात ..

कृषी क्षेत्राकरिता 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद : सदरची निधी कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता उपयोगात आणला जाणार आहे . शेतीमधील उत्पादन क्षमता वाढावी ,याकरिता डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर शेती करिता उपलब्ध करून दिली जाणार आहे . ज्यामधून शेतीचे सर्वेक्षण , मृदा परीक्षण अशा बाबीमधून शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे.  त्याचबरोबर नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याकरिता प्रोत्साहन दिले जाणार आहे . आगामी वर्षांमध्ये एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्याकरिता प्रोत्साहन दिले जाणार आहे .

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेच्या मर्यादेमध्ये वाढ : सदर अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनाची मर्यादा वाढवण्यात आली आहे . यामध्ये कर्जाची मर्यादा चक्क दुप्पट करण्यात आली आहे . यापूर्वी सदर योजना अंतर्गत दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जात होते . तर आता सदर योजना अंतर्गत तब्बल वीस लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत .

त्याचबरोबर शेतकऱ्यांकरिता शेतीमालाला किमान आधारभूत किमतीचे जाहीर करण्यात आले आहेत . तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना पुढील पाच वर्षाकरिता वाढवण्यात आलेली आहे , एकंदरीत कृषी क्षेत्राकरिता अर्थसंकल्पामध्ये प्राथमिकता दिले असल्याचे दिसून येत आहे .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *