Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Web Camera on Election Center ] : मतदान केंद्रावर मुक्कामी असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांवर आता निवडणूक अधिकाऱ्यांची करडी नजर राहणार आहे . याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडून महत्वपुर्ण निर्देश देण्यात आलेले आहेत .

प्राप्त माहितीनुसार , मुक्कामी असणारे मतदान अधिकारी कर्मचारी हे रात्रीच्या वेळी मतदान केंद्रावर मद्य प्राशन करतात , व तेथे पार्टी करतात . अशा वेगवेगळ्या तक्रारी आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहेत . याकरीता निवडणूक आयोगांकडून आता 50 टक्के मतदान केंद्रावर वेब कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

तर कर्मचाऱ्यांच्या बाजुने विचार केला असता , बहुदा मतदान केंद्रावर जेवणाची तसेच झोपण्याची पुरेसे सोयी – सुविधा नसते . तर सकाळच्या वेळी अंघोळीसाठी पाण्याची सुविधा नसते . तर काही ठिकाणी प्रात : विधी करीता बाहेर उघड्यावर जावे लागते .

परंतु या बाबत शासन पुरेशी सोयी – सुविधा उपलब्ध करुन देते , परंतु त्या सुविधांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होती कि नाही हा चिंतेचा विषय आहे . अशा परिस्थितीमध्ये देखिल मतदान अधिकारी / कर्मचारी सकाळी लवकरच उठून मॉक पोल घेतात , व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडतात .

तर वेब कॅमेरे बसविणे हे मतदान प्रक्रिया सुरळीत होण्याकरीता बसविले जावेत , परंतु त्यांचा हेतु हा कर्मचाऱ्यांच्या पार्टी यावर लक्ष ठेवण्यासाठी नसावेत . मतदान केंद्रावर मद्य प्राशन किंवा पार्टी करणे या बाबी चुकीच्या आहेत . परंतु मतदान प्रक्रिया करीता नियुक्त अधिकारी / कर्मचारी अधिक जबाबदारीने काम करत असतात .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *