Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ vitesh khandekar ] : राज्य विधानसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी कर्मचाऱ्यांना विशेष आव्हान करण्यात आले आहेत , यासाठी काल दि.03.11.2024 रोजी MNT News Network चॅनेलच्या माध्यमातुन सरकारी कर्मचारी व त्यांच्या समस्या सुटण्याच्या प्रतिक्षेत या विषयावर चर्चा करण्यात आली आहे .

जुनी पेन्शनचा प्रमुख मुद्दा : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना , महाराष्ट्र या संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात विविध मोर्चे तसेच नुकतेच आमरण उपोषण करण्यात आले . ही प्रमुख मागणी समोर ठेवून सदर संघटना वेळोवेळी लढा देत आहे .

तर आगामी विधानसभा निवडणूकीत सरकारकडून आपल्या मागणी पुर्ण कश्या होतील , ते कोणत्या पक्षाकडून पुर्ण होतील . या बाब लक्षात ठेवून मतदान करण्याचे आव्हान वितेश खांडेकर यांच्याकडून करण्यात आलेले आहेत . यावेळी ते बोलताना सांगत होते कि , जो पक्ष कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेईल , त्यावर योग्य तो तोडगा काढेल . अशा पक्षांनाच मत देण्याचे आव्हान करण्यात आलेले आहेत .

तसेच राज्यात आज तागायत 17.50 लाख सरकार कर्मचारी आहे , तसेच त्यांचे कुटुंब मिळून खुप मोठी संख्या होते , यामुळे कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष द्यायला हवेत . असे वितेश खांडेकर यांनी बाब नमुद केली आहे .

जो पेन्शन देईल , त्यालाच मतदान करेल अशी भुमिका : जो पक्ष आपल्याला जुनी पेन्शन लागु करेल , त्यालाच मतदान करेल अशी एक प्रकारची शपथ कर्मचाऱ्यांनी घ्यावी , तसेच Vote For OPS चा न्यारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात यावा , अशा प्रकारचे आव्हान कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *