Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ virodhi parti support to state employee old pension ] : महाराष्ट्रातील NPS धारक कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना जशाच्या तसे लागू करण्यात यावी , अशी राज्य कर्मचाऱ्यांची खूप दिवसापासून मागणी आहे . या मागणी करिता आता विद्यमान विरोधी पक्षांची राज्य कर्मचाऱ्यांसाठी सहकार्यात्मक भूमिका दिसून येत आहे . याबाबत विरोधी पक्ष यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) , शिवसेना बाळासाहेब ठाकरे (उद्धव ठाकरे गट ) व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्यामार्फत राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणी करिता राज्य सरकारकडे मागणी करीत आहे .
सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुका सुरू असून आगामी काळामध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत . त्या अनुषंगाने विद्यमान राज्यातील विरोधी पक्षांची राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन करिता सहकार्यात्मक भूमिका घेतली जात आहे . यामुळे विरोधी पक्षांना कर्मचाऱ्यांकडून निवडणुकांमध्ये मदत होईल अशी अपेक्षा विरोधी पक्षांची आहे.
यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची राज्यामध्ये सत्ता स्थापन झाल्यास राज्यातील कर्मचाऱ्यांना देशातील राजस्थान ,हिमाचल प्रदेश, झारखंड ,छत्तीसगड या राज्यामध्ये लागू केल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ लागू करण्यात येईल असे आश्वासन देणारे पत्र महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून वेळोवेळी जाहीर केले जात आहेत. वर नमूद केलेल्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे . यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या बाजूने आहे , शिवाय त्यांच्या निवडणुका जाहीरनाम्यामध्ये देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे .
या संदर्भात राज्यातील विद्यमान विरोधी पक्षांनी जुनी पेन्शन संदर्भात जाहीर केलेले सविस्तर पत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.