Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ vidhansabha election update ] : विधानसभा सार्वत्रिक निवडणूका बाबत मुख्य निवडणुक अधिकारी यांच्यामार्फत अत्यंत महत्वपुर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . सदर प्रसिद्धीपत्रकानुसार ,शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार , प्रसारावर बंदी घालण्यात आलेली आहे .

सदच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्यात दि.20.11.2024 रोजी होणाऱ्या निवडणूकीसाठी सोमवार दि.18.11.2024 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून शांतता कालावधी सुरु झालेला आहे . सदर काळात मतदान संपेपर्यंतच्या 48 तासांमध्ये लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 126 अंतर्गत मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक सभा , मिरवणूका आयोजित करण्यास…

उपस्थित राहण्यास अथवा सहभागी होण्यास मनाई आहे . या अटींचे उल्लंघन झाल्यास दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतुद करण्यात आलेली आहे . अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेली आहे .

तसेच लोकप्रतिनिधीत्व कायद्याच्या अनुषंगाने भारत निवडणुक आयोगाने निर्देश जाहीर केले आहेत , त्यानुसार निवडणुक प्रचाराच्या शांतता काळांमध्ये मुद्रीत माध्यमांमध्ये छापण्यात येणाऱ्या राजकीय जाहीरातीत पुर्व प्रमाणिकरण समितीची मान्यता असल्या शिवाय या जाहीराती वृत्तपत्रामध्ये छापू नये , अशा आयोगाच्या सुचना आहेत .

तसेच दृकश्राव्ये माध्यमे ( टेलिव्हिजर , केबल नेटवर्क , रेडिओ आणि सोशल मिडीया ) यावर प्रचाराच्या शांतता कालावधीत राजकीय जाहीरातींना मनाई आहे . या संदर्भातील सविस्तर प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *