Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ vidhansabha election duty imp pustika ] : विधानसभा निवडणुका कामकाज करीता नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी कामकाज प्रक्रिया , निवडणूक कर्तव्य , साहित्य यंत्रांची तपासणी , मतदान साहित्य विवरण इ. संदर्भात माहीती विशद करण्यात आलेली आहे .
मतदान प्रक्रिया , मतदान अधिकारी नुसार कामकाज , मतदार नोंदवही , तसेच नमुना 17 अ मधील विविध नोंदी , मतदानाच्या दिवशी मतदाना दरम्यान विविध प्रकारचे विशेष प्रकरणे , मतदान केंद्राची रचना कशी करावी . तसेच मतदान यंत्रे जोडणी तसेच मतदानाच्या दिवशी EVM-VVPAT तयार करणे मॉक पोलबाबत काही महत्वाच्या बाबी विशद करण्यात आलेले आहेत .
याशिवाय मॉक पोल नंतर सीयू सील करणे , मॉक पोल नंतर VVPAT Drop Box सील करणे , मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग केल्यास करावयाची कार्यपद्धती विशद करण्यात आलेली आहे . मतदार यादीतील किरकोळ चुका दुर्लक्षित करण्याची पद्धती तसेच प्रदत्त मते , आव्हानित मते , मतदान करण्यास नकार देणे , टेस्ट व्होट नोंद घेणे इ.बाबी नमुद करण्यात आलेली आहे .
तसेच बदली व्यक्तीद्वारे मतदान , तसेच मतदाराच्या वयाबाबत तक्रारी संदर्भात घ्यावयाची काळजी , EDC मतदान प्रक्रियेबाबत माहिती , नमुना 17 अ मध्ये EDC बाबतची नोंद घेणे , तसेच मतदान समाप्त करणे व मतदान यंत्र माहेरबंद करणे , मतदान पुस्तिका , लिफाफ व मतदान नमुने मोहरबंद करणे इ.बाबी नमुद करण्यात आलेले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.