Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ vidhan parishad election result 2024 ] : महाराष्ट्र राज्यातील विधानपरिषदाच्या पदवीधर , शिक्षक मदारसंघाचे निकाल काल दिनांक 01 जुलै 2024 रोजी जाहीर झाले आहेत , यांमध्ये पुन्हा महायुती सरकारला झटका मिळाला आहे , या निवडणूकीत ठाकरे गटाने पुन्हा बाजी मारल्याचे दिसून येते , सर्व जागावरील निकाल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
राज्यात कोकण पदवीधर , मुंबई पदवीधर , मुंबई शिक्षक मतदारसंघ , नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूका संपन्न झालेल्या होत्या , या निवडणुकाचे निकाल कालच जाहीर झालेले असून सदर निवडणुकीत कोणते उमेदवार रिंगणात होते , तर कोणत्या उमेदवारांचा विजय झाला ते सविस्तरपणे खालीलप्रमाणे जाणून घेवू ..
नाशिक शिक्षक मतदारसंघ : नाशिक शिक्षक मतदारसंघातुन शिंदे गटाकडून किशोर दराडे तर ठाकरे गटाकडून संदिप गुळवे रिंगणात होते , यांच्यामध्ये अटीतटीचा सामाना दिसून आला , यांमध्ये महायुतीचे किशोर दराडे यांचा विजय झाला .
मुंबई शिक्षक मतदारसंघ : मुंबई शिक्षक मतदारसंघातुन भाजपाकडून शिवनाथ दराडे तर महाविकास आघाडी कडून ज.मो.अभ्यंकर तर शिक्षक भारती गटाकडून सुभाष मोरे रिंगणात होते , यांमध्ये महाविकासचे ( ठाकरे गट ) ज.मो.अभ्यंकर यांचा विजय झाला .
मुंबई पदवीधर : मुंबई पदवीधर मतदार संघातुन भाजपाकडून किरण शेलार तर ठाकरे गटाकडून अनिल परब रिंगणात होते , यांमध्ये ठाकरे गटाचे अनिल परब यांचा तब्बल 26 हजार 20 मतांनी विजय झाला , ते सन 2012 व 2018 मध्ये विधानपरिषदेवर निवडून आलेले आहेत .
कोकण पदवीधर मतदारसंघ : कोकण पदवीधर मतदारसंघातुन भाजपाकडून निरंजन डावखरे तर काँग्रेस कडून रमेश कीर हे रिंगणात होते , यांमध्ये भाजपाचे निरंजन डावखरे यांचा विजय झाला .