Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Vidarbha & Marathavada Farmer Good News GR Publish ] : मराठवाडा व विदर्भ विभाग मधील सर्वसाधारण वर्गवारीतील दिनांक 31 मार्च 2018 नंतरच्या कृषीपंप वीज जोडणी 2020 योजनातील प्रलंबित कृषीपंप अर्जदारांना वीज जोडणी देण्याकरीता सन 2023-24 मध्ये रुपये 100 कोटी निधी रोखीने वितरीत करणेबाबत राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा , कामगार व खनिजकर्म विभागांकडून दिनांक 26 मार्च 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्यातील दिनांक 31 मार्च 2018 अखेर पैसे भरुन वीज जोडणी करीता प्रलंबित असलेल्या सुमारे 2.24 लाख कृषीपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्याकरीता शासन निर्णय दिनांक 05 मे 2018 नुसार मान्यता देण्यात आलेली आहे . सदर योजनेच्या रुपये 5048/- कोटी इतक्या प्रकल्प खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे .

सदर योजना अंतर्गत विदर्भ व मराठवाडा विभागातील प्रलंबित कृषीपंपांना वीज जोडण्या देण्याकरीता रुपये 2248.09/- कोटी रुपये इतका निधी अनुदान स्वरुपात महावितरण कंपनीस वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे . तर उर्वरित महाराष्ट्र राज्यातील प्रलंबित कृषीपंप अर्जदारांसाठी वीज जोडणी देण्याकरीता  येणारा खर्च रुपये 2800/- कोटी महावितरण कंपनी बँकाकडून कर्ज घेवून उभारित आहे .

सदरच्या शासन निर्णयानुसार , उच्चदाब वितरण प्रणाली योजना अंतर्गत विदर्भ व मराठवाडा विभागातील सर्वसाधारण वर्गवारीतील दिनांक 31 मार्च 2018 नंतरच्या कृषीपंप वीज जोडणी धोरण – 2020 अंतर्गत प्रलंबित वीज जोडण्यांसाठी व त्याकरीता उभारण्यात येणाऱ्या उपकेंद्रासाठी रुपये 100,00,00,000/- ( अक्षरी – शंभर कोटी रुपये फक्त ) इतका निधी महाविरण कंपनीस रोखीने वितरीत करण्यास सदर शासन निर्णयानुसार मंजूरी देण्यात येत आहेत .

सदरच्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेल्या अर्थसहाय्याची रक्कम ज्या कारणासाठी मंजूर करण्यात आलेली आहे , त्याच कारणांसाठी उपयोगात आणली जाईल याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .या संदर्भात उद्योग , उर्जा व कामगार व खनिजकर्म विभागांकडून दिनांक 26 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *