७ व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने वेतन पडताळणीच्या संदर्भातील आक्षेपांवरील मार्गदर्शक पुस्तिका – वित्त विभाग !

Spread the love

राज्यातील लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नियंत्रणाखाली असलेली वेतन  पडताळणी पथकांकडून विविध विभागांतील राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे वेतन पडताळणी केली जाते .वेतननिश्चिती प्रकरणांची पडताळणी करतांना काही प्रमाणात त्रुटी / उणीवा / अपूर्णता आढळून आल्यास पथकांकडून प्रकरणे आक्षेपीत केली जातात. सदरचे आक्षेपांची पुर्तता करण्यासाठी संबंधित कार्यालयांकडून बराच कालावधी लागत असतो. सेवापुस्तकांना वेतन पडताळणी पथकाकडून लागणाऱ्या आक्षेपांची संख्या कमी व्हावी यासाठी मार्गदर्शक म्हणून वेतन पडताळणी मार्गदर्शिका ” ही वित्त विभागांकडून पुस्तिका प्रसिध्द करण्यात आली आहे .

सदर पुस्तिकेचा वापर करून वेतन पडताळणी प्रकरणांना लागणाऱ्या आक्षेपांचे प्रमाण कमी करता येईल आणि ही पुस्तिका विविध विभागातील आहरण व संवितरण अधिकारी / नियंत्रक अधिकारी / कार्यालयप्रमुख यांना निश्चितच उपयुक्त उपयुक्त ठरणार आहे . 

म.ना.से. (निवृत्तीवेतन) नियम १९८२ मधील नियम १२१ ते १२६ नुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीपूर्वी करावयाच्या कार्यवाहीबाबत स्पष्ट नियम करण्यात आले आहेत. यानुसार राज्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे सेवापुस्तक वेतनपडताळणी पथकाकडून पडताळणी करणे आवशयक आहे , तथापि असे निदर्शनास आले आहे की, बहुतांश कार्यालये कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीला एक किंवा दोन महिने शिल्लक असतांना किंवा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवापुस्तक पडताळणीसाठी सादर करतात. यास्तव कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन वेळेत मिळत नाही. त्यांची प्रकरणे प्रलंबित राहतात. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणे, लोक आयुक्त प्रकरणे व माहितीच्या अधिकारातील प्रकरणे उद्भवतात. वेतन पडताळणी पथकाने निदर्शनास आणलेले आक्षेप / त्रुटी यांचे वेळीच निराकरण संबंधित कार्यालयाने केल्यास वेतन पडताळणी सुरळीत होवून कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन व भत्ते आणि निवृत्तीवेतन विषयक लाभ प्रदानाची प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत.

शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळी सेवापुस्तक पडताळणीस विलंब लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी कार्यालयाच्या विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी वेतन आयोगानुसार वेळोवेळी कर्मचाऱ्यांची वेतननिश्चितीची प्रकरणे वेतन पडताळणी पथकाकडून प्रमाणित करुन घेण्याची दक्षता घ्यावी. वेतन पडताळणीचे काम जास्तीत जास्त पारदर्शी होण्याच्या दृष्टीकोनातून वेतनिका ही संगणकीय प्रणाली बनविण्यात आली आहे. वेतन पडताळणी पथकास प्राप्त होणारी दैनंदिन सेवापुस्तके वेतनिका प्रणालीमार्फत स्विकारण्यात येतात.

सेवापुस्तक वेतन पडताळणी पथकाकडे प्राप्त झाल्यानंतर उक्त प्रणालीमार्फत संबंधितांचा सेवार्थ ID / सेवापुस्तक ID चा वापर करुन आहरण व संवितरण अधिकारी तसेच कर्मचाऱ्यालाही सेवापुस्तकाची सद्यस्थिती पाहता येते. सेवापुस्तक वेतन पडताळणी पथकास प्राप्त झाल्याचा दिनांक, सेवापुस्तक प्रलंबित / प्रमाणित / आक्षेप यांची माहिती मिळते. तसेच वेतन पडताळणी पथकाकडून सेवापुस्तक पडताळणी पूर्ण झाल्याची माहिती, वेतनिका प्रणालीत सेवापुस्तक प्रविष्ट करतेवेळी संबंधित कार्यालयानी नोंदविलेल्या मोबाईल क्रमाकांवर SMS व्दारे प्राप्त होते . यांमध्ये प्रामुख्याने सेवापुस्तकात आवश्यक असणाऱ्या नोंदी ,सेवापुस्तकात आवश्यक असणाऱ्या नोंदी ,वेतननिश्चितीचे प्रसंग – (अ)  , विकल्प (ब) ,सातवा वेतन आयोग ,आश्वासित प्रगती योजना ,वेतननिश्चिती पडताळणीसाठी तांत्रिक सुचना ,सेवापुस्तकाची वेतन पडताळणी करतांना लावण्यात येणारे सर्वसाधारण आक्षेप या बाबींचा विचार करण्यात आलेला आहे .

सेवापुस्तकात आवश्यक असणाऱ्या नोंदी (अ) – सेवापुस्तक हे अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवेचा अत्यंत महत्वाचा अभिलेख आहे. हा अभिलेख ‘अ’ वर्गात मोडत असल्याने तो प्रदिर्घ कालावधी पर्यंत जतन करुन ठेवणे व सुस्थितीत ठेवणे ही त्या संबंधित कार्यालयाची जबाबदारी आहे. सेवापुस्तक अपूर्ण असेल/ काही आक्षेप असतील तर संबंधित अधिकारी/ कर्मचारी यांना निवृत्तीनंतरचे देय लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होतात. तरी सेवापुस्तकास आक्षेपच लागू नयेत या करीता खालील बाबींची पूर्तता कर्मचारी सेवेत कार्यरत असतांनाच करुन घेण्याची कार्यवाही कार्यालय प्रमुख / आहरण व संवितरण अधिकारी यांनी करणे आवश्यक आहे. सेवापुस्तक अद्ययावत ठेवण्याच्या दृष्टीने सेवापुस्तकात खालील बाबींच्या नोंदी असणे आवश्यक आहे. 

प्रथम नियुक्तीचा  या बाबींमध्ये शासकीय सेवेत प्रथम नियुक्तीचा दिनांक ,कार्यालयाचे नाव व पदनाम ,प्रथम नियुक्तीच्या आदेशाची प्रत ,वैद्यकीय तपासणी अहवालाची नोंद , वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र सेवापुस्तकास जोडलेले असावे , चारित्र्य पडताळणीची नोंद , प्रथम पृष्ठावरील जन्मतारीख / पडताळणी केली आहे काय ? , जात पडताळणी प्रमाणपत्राची नोंद , स्वग्राम जाहीर केल्याची नोंद ,सेवेत कायम करण्यात आल्याची नोंद , परीविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्याची नोंद , विभागीय परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद ,

विवाहानंतरच्या नांव बदलाबाबतची नोंद , संगणक परीक्षा उत्तीर्ण (एमएससीआयटी व इतर) , संगणक चाचणी परीक्षा उत्तीर्ण , मराठी भाषा परीक्षा सूट देणेबाबतचा आदेश , हिंदी भाषा परीक्षा सूट देणेबाबतचा आदेश , प्रथम पानावरील प्रत्येक पाच वर्षांनी सेवा प्रमाणित केली आहे का ? , पाठीमागील पानावरील सेवा प्रमाणित आहे काय? ,वयाच्या ५०/५५ व्या वर्षा पलीकडे / अर्हताकारी सेवेच्या ३० वर्षानंतर शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकन केल्याबाबतची नोंद , वयाच्या ५०/५५ व्या वर्षा पलीकडे / अर्हताकारी सेवेच्या ३० वर्षानंतर शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकन करुन मुदत पूर्व सेवानिवृत्त केले असल्यास त्याबाबतची नोंद , सेवाअंतर्गत प्रशिक्षण नोंद या बाबींची नोंद असणे आवश्यक आहे .

वार्षिक वेतनवाढ मंजुरी नंतर रकाना क्रमांक ८ मध्ये कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी , २४. मानीव दिनांक नोंद , मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील क्र. ८९२८/२०१५ दिनांक ०६/०७/२०१७ रोजी ,दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे सेवेत रुजू झालेल्या व जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग ,करण्याच्या सूचना शासन निर्णय दिनांक २१/१२/२०१९ व ०५/१०/२०२० च्या अंमलबजावणी बाबतची नोंद पुढील प्रमाणे विविध नामनिर्देशनाच्या नोंदी आवश्यक आहेत

भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांकाची नोंद , राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) खाते क्रमांकाची नोंद ,भविष्य निर्वाह निधीचे नामनिर्देशन पत्र नोंद ,राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) नामनिर्देशन पत्र नोंद ,कुटूंब निवृत्तीवेतन नामनिर्देशन पत्र नोंद ,सेवा उपदानाचे नामनिर्देशन पत्राची सेवापुस्तकात नोंद , कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाची अद्ययावत नोंद ,अद्ययावत कुटूंबाचे प्रमाणपत्र , विवाहा नंतर अथवा अन्य काही कारणाने नामनिर्देशन बदलले असल्यास त्याबाबतची अद्ययावत नोंद ,

गट विमा योजना तपशिल ,गट विमा योजना १८८२ चे सभासद झाल्याची आदेशाची नोंद ,गट विमा योजना १८८२ चे नामनिर्देशन पत्राची नोंद , गट विमा योजना वर्गणी (०१/०५/१९८२) , गट विमा योजना वर्गणी ( ०१/०१/१९९०) , गट विमा योजना वर्गणी ( ०१/०१/१९९८)  , गट विमा योजना वर्गणी (०२/०९/२०१०) , गट विमा योजना वर्गणी ( ०१/०२/२०१६) , पदोन्नतीनंतर वाढीव गटविमा योजनाची नोंद (दिनांक व रक्कम) , विवाहा नंतर अथवा अन्य काही कारणा ने नामनिर्देशन बदलले असल्यास त्याबाबतची अद्ययावत नोंद सेवापुस्तकात आवश्यक असणाऱ्या नोंदी (ब) मध्ये प्रथम नियुक्ती आदेश नोंद ,महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम २००६ वेतननिश्चिती संदर्भात वेतननिश्चिती ,पथकांनी आक्षेप नोंदविला असल्यास आक्षेप चिठ्ठीसह त्याची केलेली पूर्तता. , दिनांक ०१/०४/१९६६ आणि ०१/०४/१९७६ च्या वेतननिश्चितीची पडताळणी झालेली ,नसल्यास वित्त विभागाच्या दिनांक ११ जून, १९७९ आणि २० ऑगस्ट, १९८६ च्या आदेशान्वये , सेवापुस्तकामध्ये नोंदविलेले प्रमाणपत्र,वेतन पडताळणी पथकाकडून पडताळणी झाल्यानंतर पूर्वलक्षी प्रभावाने वेतनश्रेण्या सुधारीत ,झालेल्या असतील. तर त्या अनुषंगाने केलेल्या वेतननिश्चितीची विवरणपत्रे आणि विकल्प कर्मचाऱ्याने पदोन्नती प्रसंगी / कालबध्द पदोन्नती प्रसंगी दिलेला विकल्प (दिलेला असल्यास) एतदर्थ मंडळाची मराठी/ हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण झाल्याची/ सूट दिल्याची नोंद , राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बाबतीत महालेखापालाकडून / अधिदान व लेखा कार्यालय,

मुंबई यांचेकडून प्राप्त झालेले २५ अ / २५ ब ची विवरणपत्रे , कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा दिनांक अभिवृध्दी करुन वरिष्ठास मंजूर केलेला असल्यास किंवा कनिष्ठाच्या वेतन एवढे वेतन वाढवून दिलेले असल्यास त्याबाबतच्या आदेशाची प्रत , पदोन्नतीचा मानीव दिनांक मंजूर करुन देण्यात आलेला असल्यास असा मानीव दिनांक मंजूर , करुन देण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याच्या आदेशाची प्रत , कर्मचारी गैरहजर असेल/ असाधारण रजेवर असेल / निलंबित असेल तर त्यापुढील वेतनवाढी ,नियमित केल्याचे आदेश ,सेवा प्रवेशोत्तर परीक्षा / विभागीय परीक्षा व पर्यवेक्षिय परीक्षा विहित कालावधीमध्ये उत्तीर्ण , झाल्याची नोंद , संगणक अर्हता परीक्षा किंवा (MSCIT) उत्तीर्ण असल्याची नोंद ,

वेतननिश्चितीच्या नोंदी / वेतननिश्चिती विवरणपत्रे व विकल्प , चौथा वेतन आयोग (०१/०१/१९८६) , पाचवा वेतन आयोग (०१/०१/१९९६) , सहावा वेतन आयोग (०१/०४/२००६) , सातवा वेतन आयोग (०१/०१/२०१६) ,पद्मनाभ आयोग , वेतन पडताळणी पथकाने वेतननिश्चिती पडताळणी केली असल्यास त्याच्या नोंदी , भोळे आयोग ,  चौथा वेतन आयोग  , पाचवा वेतन आयोग , सहावा वेतन आयोग , सातवा वेतन आयोग , पद्मनाभ आयोग आदेशाची नोंद ,निवडश्रेणी अकार्यात्मक वेतनश्रेणी मंजूर आदेशाची नोंद , नियमित वेतनवाढी दिल्याची नोंद , कालबध्द पदोन्नती/ आश्वासित प्रगती योजना लाभ मंजूरी नोंद / वेतन निश्चिती नोंद व विवरणपत्र , रजा मंजूर केल्याच्या नोंदी / संपूर्ण रजा लेख्यातील नोंदी पूर्ण करण्यात आल्या आहेत का ? 

वेतननिश्चितीचे प्रसंग महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ वेतन निश्चितीचे प्रसंगी – शासकीय कर्मचारी सेवेत असताना त्याची ज्या पदावर प्रथम नियुक्ती होते तेव्हापासून त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत वेळोवेळी वेतननिश्चितीचे प्रसंग येतात. थोडक्यात खालीलप्रमाणे :– प्रथम नियुक्ती , उच्च पदावर पदोन्नती , अधिक जबाबदारी नसलेल्या दुसऱ्या पदावर नियुक्ती , म.ना.सेवा (सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१ मधील नियम २७ नुसार कमी वेतन असलेल्या पदावर नियुक्ती निवडश्रेणीच्या पदावर नियुक्ती , एका संवर्गबाह्य पदावरुन दुसऱ्या संवर्गबाह्य पदावर नियुक्ती ,संवर्गबाह्य/स्वीयेत्तर सेवा / प्रतिनियुक्तीच्या पदावरुन प्रत्यावर्तन ,

खंडानंतरची नियुक्ती , वेतन श्रेणीत बदल झाल्यास प्रशासकीय कारणास्तव उच्च पदावरुन खालच्या पदावर प्रत्यावर्तन / पदावनत , वेतनात कपात / वेतन वाढ रोखून धरणे , माजी सैनिकांची पुनर्नियुक्ती नंतरची वेतननिश्चिती , निवृत्ती वेतनधारकांची पुनर्नियुक्ती , वेतनश्रेणीत सुधारणा , पदोन्नतीचा मानीव दिनांक मंजूर करुन देण्यात आलेला असल्यास  सुधारित वेतन आयोग ..

सातवा वेतन आयोग – दिनांक ०१/०१/२०१६ पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार शासन अधिसूचना दिनांक ३० जानेवारी, २०१९ व शासन परिपत्रक क्र. वेपूर २०१९/प्र.क्र.१५/सेवा-९, दिनांक १४/०५/२०१९ अन्वये , सातवा वेतन आयोग शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना लागू करण्यात आला आहे. ज्या शासकीय अधिकारी/ कर्मचाऱ्यांची दिनांक ०१/०१/२०१६ किंवा तद्नंतर पदोन्नती / नियुक्ती अथवा श्रेणीवाढ झाली नसेल त्यांच्या ०१ जुलैच्या वेतनवाढीच्या दिनांकात बदल होणार नाही. अशा प्रकरणी जानेवारी हा वेतनवाढीचा दिनांक घेता येणार नाही.

एक वर्षाच्या कालावधी मध्ये केवळ एकच वेतनवाढ अनुज्ञेय असेल. दिनांक ०१/०१/२०१६ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यास विकल्पाच्या आधारे वेतननिश्चिती अनुज्ञेय नाही. निलंबित कर्मचारी/ असाधारण रजेवरील कर्मचारी यांना कामावर रुजू झाल्याच्या दिनांकापासून तरतूदी लागू राहतील. दिनांक ०१/०१/२०१६ ते ३१/१२/२०१८ या कालावधीत जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या प्रकरणी कार्यालय प्रमुखाने मृत कर्मचाऱ्यास फायद्याची ठरेल त्यानुसार वेतननिश्चिती करावी .  भाग – ४ आश्वासित प्रगती योजना – राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या (१०, २० व ३० वर्षानंतर पात्रतेनुसार अनुज्ञेय करणारी) महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ०२/०३/२०१९ नुसार सुधारीत सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे.

सदरची योजना दिनांक ०१/०१/२०१६ पासून अंमलात आली आहे. सातव्या वेतन आयोगातील वेतन स्तर एस-२० पर्यंत वेतन घेणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सदर योजना लागू राहील. या योजनेतील पात्र अधिकारी / कर्मचारी यांना संपूर्ण सेवेत पात्रतेनुसार तीन वेळा लाभ मंजूर होईल, जर कार्यात्मक दोन वेळा पदोन्नत्या मिळाल्या असतील तर या योजनेत एकच लाभ अनुज्ञेय होईल. जे अधिकारी / कर्मचारी दिनांक ०१/०१/२०१६ पूर्वीच शासन सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत / मृत्यू पावले आहेत त्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय ठरणार नाही. जरी दि. ०१/०१/२०१६ पूर्वी या योजनेच्या लाभास अधिकारी / कर्मचारी पात्र ठरत असले तरी, दिनांक ०१/०१/२०१६ पासूनच या योजनेचा लाभ अनुज्ञेय असेल.

 वेतननिश्चिती पडताळणीसाठी तांत्रिक सूचना – सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती पडताळणीसाठी महत्वाच्या तांत्रिक सूचना पुढीलप्रमाणे आहेत . सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांची ७ व्या वेतन आयोगाची वेतननिश्चिती संचालनालय लेखा व कोषागारे, मुंबई यांनी विकसीत केलेल्या वेतनिका प्रणालीतूनच करणे आवश्यक आहे. वेतनिका प्रणालीतून तयार झालेले ७ व्या वेतन आयोगाच्या वेतननिश्चितीच्या स्वाक्षरीचे विवरणपत्र सेवापुस्तकात जोडून सदर वेतननिश्चितीची नोंद सेवापुस्तकात घ्यावी.जर एखाद्या कर्मचाऱ्याची ६ व्या वेतन आयोगाची पडताळणी झाली नसेल तर i) प्रथम जुन्या वेतनिका प्रणालीतून General Service Book ID करुन Submit Service Book मधून सेवापुस्तक वेतनपडताळणी पथकासाठी सादर करण्याचे पत्र तयार करावे. ii) ७ व्या वेतन आयोगासाठी नवीन वेतनिका प्रणालीतून (जुन्या वेतनिका प्रणालीवर सर्वात खाली दिलेल्या For ७th Pay verification click here) वर Click करुन येणाऱ्या screen मध्ये वेतननिश्चिती चे कामकाज करावे. नवीन वेतनिकेत DDO login मधून सेवापुस्तक वेतन पडताळणी साठी पथकाकडे सादर करावयाचे पत्र तयार करावे. 

जर एखाद्या कर्मचाऱ्यांची ७ व्या वेतन आयोगाची वेतननिश्चिती वेतनिका प्रणाली मधून सध्या ज्या कार्यालयात कार्यरत आहे. त्याच कार्यालयातून करण्यात आली असेल तर Generate Service Book ID, Submit Service Book हे मेनू वापरुन सेवापुस्तक वेतन पडताळणी पथकाकडे सादर करावयाचे पत्र तयार करावे. वेतन पडताळणी पथकाकडून सेवापुस्तक पडताळणी झाल्यानंतर वेतन पडताळणी प्रमाणपत्र वेतनिका प्रणाली मधूनच तयार होते व ते सेवा पुस्तकात चिकटवून त्यावर लेखा अधिकारी वेतन पडताळणी पथक यांच्याकडून स्वाक्षरीत केले जाते. वेतन पडताळणीचे सर्व काम वेतनिका प्रणाली मार्फतच होत असल्याने वेतननिश्चिती करणे, Generate Service Book ID, Submit Service Book ई. कामे वेतनिका प्रणाली तूनच करणे आवश्यक आहे. सुलभ संदर्भासाठी नवीन वेतनिका प्रणाली वरील User Manual for DDO पहावे. 

हस्तलिखित पध्दतीने सेवापुस्तक वेतन पडताळणी पथकाव्दारे स्वीकारले जाणार नाही. जर एखाद्या सेवापुस्तकात आक्षेप असेल तर तो देखिल वेतनिका प्रणाली मधूनच लावण्यात येतो व आक्षेप लावल्यानंतर सदरचे सेवापुस्तक पुन्हा Submit Servicebook या option मध्ये दिसेल. तसेच सेवापुस्तकास लागलेला आक्षेपही View objection details वर click केल्यावर दिसेल. 

वेतन पडताळणी पुस्तिका

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी अथवा सेवानिृत्त पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment