वरिष्ठ निवडश्रेणी : डी.एड किंवा बीएड धारक शिक्षकांना सरसकट निवडश्रेणी लागु होणार ..

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Teachers Varishtha NivadaShreni News ] : शिक्षकांना सेवा व प्रशिक्षण नुसार वरिष्ठ निवडश्रेणी लागु करण्यात येते असते . आता डी.एड किंवा बीएड धारक शिक्षकांना सरसकट निवडश्रेणी लागु करण्यात येणार आहेत , याकरीता शिक्षक कर्मचारी संघटनेमार्फत पाठपुरावा करण्यात आलेला आहे .

शिक्षक भारती संघटनेच्या वतीने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.दीपक केसरकर त्याचबरोबर शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना पत्राद्वारे मागणी केली आहे  कि , राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील कार्यरत डीएड अथवा बीएड शिक्षकांना सरसकट निवडश्रेणी लागू करण्यात यावे .

सध्याच्या घडीला इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे आकर्षण अधिकच वाढले असल्याने , मराठी माध्यमातील शिक्षकांचे अतिरिक्त होण्याचे प्रमाण अधिकच वाढले आहेत , यामुळे सदर शिक्षकांना इतर शाळांमध्ये वर्ग करण्यात येते , तर सदर वर्ग करण्यात आलेल्या शाळेत सदर शिक्षकांची पुर्वीची सेवा ज्येष्ठता डावलली जाते . यामुळे नविन सेवा ज्येष्ठतानुसार सदर शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ लवकर मिळत नाही .

शिवाय कमी सेवा ज्येष्ठता यामुळे शाळेतील 20 टक्के पदे उपल्ध नसल्यास , तेथिल पात्र शिक्षकांना कधीच निवडश्रेणीचा लाभ अनुज्ञेय होत नाही . राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 10 , 20 , 30  वर्षाच्या अर्हताकारी सेवा नंतर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळतो , परंतु शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ घेण्यासाठी 20 टक्के पदांमध्ये पात्र व्‍हावे लागते , यांमध्ये शासकीय शाळांमध्ये शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळून जाते , परंतु अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना मोठ्या कालावधीची वाट पाहावी लागते .

कारण राज्य शासनांच्या खासगी अनुदानित शाळातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना चटोपाध्याय वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार , ‍त्रिस्तरीय वेतन श्रेणीचा लाभ प्राप्त करणेकरीता त्या संस्था मधील व संवर्गातील वरिष्ठ  वेतनश्रेणीतील 20 टक्के पदांनाच अनुज्ञेय आहे , यामुळे सदर अनुदानित शाळांमधील काही पदांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ सेवा संपेपर्यंत होत नाही .

यामुळे सदरची बाब शिक्षक भारती संघटनेने राज्य शासनांच्या लक्षात आणून देण्यात आलेली आहे , यावर राज्य शासनांकडून विशेष लक्ष घालून सदर कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची विनंती करण्यात आलेली आहे . अन्यथा कर्मचाऱ्यांकडून तिव्र आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment