Spread the love

State Employee Types Leave : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा काळांमध्ये विविध प्रकारच्या मिळत असतात , यांमध्ये प्रामुख्याने रजेचे दोन प्रकार पडतात , सर्वसाधारण रजा व विशेष रजा याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांस कर्तव्य कालावधीमधून सुट देणेबाबत किरकाळे ही रजा देण्यात येते . किरकोळ रजा ही एक प्रकारची कर्तव्य कालावधीमधील देण्यात आलेली सूट असते , जे कि कर्मचाऱ्यांचा अधिकार नसतो . म्हणून किरकोळ रजेला रजा न म्हणता कर्तव्य कालावधीमधून देण्यात आलेली तात्पुरती सुट असते .

01.सर्वसाधारण रजा प्रकार : सर्वसाधारण रजेमध्ये एकुण 05 प्रकारचे रजा आहेत . यांमध्ये अर्जित रजा , अर्धवेतनी रजा , परिवर्तीत रजा , अनर्जित रजा , असाधारण रजा असे सर्वसाधारण रजेचे 05 उपप्रकार पडतात . सर्वसाधारण रजा उपप्रकार व रजा नियम पुढीलप्रमाणे आहेत .

सर्वसाधारण रजा उप- प्रकाररजा नियम
अर्जित रजानियम 50 ,51
अर्धवेतनी रजानियम 60
परिवर्तीत रजानियम 61
अनर्जित रजानियम 62
असाधारण रजानियम 63

02.विशेष रजा : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवाकाळामध्ये विशेष बाबीकरीता विशेष रजेची तरतुद करण्यात आलेली आहे . यांमध्ये प्रसुती रजा / गर्भपात रजा , विशेष विकलांगता रजा ( हेतुपुरस्पर झालेल्या इजेबद्दल ) , विशेष विकलांगता रजा , रुग्णालयीन रजा , खलाशांची रजा , क्षयरोग / कर्करोग / कुष्ठरोग / पक्षघत रजा तसेच अध्ययन रजा अशा प्रकारच्या विशेष रजा कर्मचाऱ्यांना मिळत असतात . विशेष रजेचे उपप्रकार व रजेचे नियम पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

विशेष रजा उप- प्रकाररजा नियम
प्रसुती रजा / गर्भपात रजानियम 74
विशेष विकलांगता रजा ( हेतुपुरस्पर इजेबद्दल )नियम 75
विशेष विकलांगता रजा ( अपघाती इजेबद्दल )नियम 76
रुग्णालयीन रजानियम 77
खलाशांची रजानियम 78
क्षयरोग / कर्करोग / कुष्ठरोग /पक्षघात रजानियम 79 परिशिष्ठ 3
अध्ययन रजानियम 80,81,84,86,93

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *