Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ UPI Payment Limit And Other IMP Update Announce From RBI ] : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँक रेपो दर मध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही . तर RBI कडून युपीआय पेमेंट करण्याची मर्यादा वाढविण्यात आलेली आहे .यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे .
UPI ची मर्यादा 5 लाख पर्यंत : आपण फोन पे , गुगल पे , भारत पे अशा युपीआय पेमेंट ॲपद्वारे फक्त 1 लाख पर्यंत पैसे सेंड करु शकत होतो . परंतु आता RBI कडून जाहीर केल्यानुसार आता युपीआय द्वारे पाच लाख रुपये पर्यंत पैसे सेंड करु शकता ..यासंदर्भात अधिकृत्त माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची दिली आहे .
फक्त याच व्यवहारासाठी करु शकता 5 लाख पर्यंतचे व्यवहार : युपीआय पेमेंटची आवश्यकता लक्षात घेता , हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थाना 5 लाख पर्यंतचे व्यवहार करण्याची सुविधा मिळणार आहे .म्हणजेच दवाखाने , शाळा या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी युपीआयची मर्यादा ही 1 लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपये पर्यंत मर्यादा वाढविण्यात आलेली आहे .ज्यामुळे हॉस्पिटल तसेच शाळा या ठिकाणी पेमेंट सोप्यारित्या करता येईल , व युपीआयचा वापर अधिकाधिक होईल .
UPI फ्रॉड ( Fraud ) ला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकाडून उपाय : UPI फ्रॉडला पायबंद घालण्यासाठी केद्र सरकारकडून लवकरच नविन नियमावली जाहीर करण्यात येणार आहे , तर UPI फ्रॉड ( Fraud ) ALERT सुविधा प्राप्त होणार आहे . तसेच UPI द्वारे फसवणूक टाळण्यासाठी अलर्ट सिस्टिम अमलात येणार आहे .
तसेच 5000/- रुपयांपेक्षा अधिक डिजिटल पेमेंटकरीता रॅपिड अलर्ट सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे . त्याचबरोबर आता ग्राहकांना पेमेंट नंतर व्हेरिफीकेशन मॅसेज अथवा कॉल सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत . जेणेकरुन ग्राहकांस व्यवहार सुरुक्षित वाटल्यानंतर पुढील प्रक्रिया पुर्ण करेल .त्याचबरोबर केंद्र सरकारकडून UPI फ्रॉड ( Fraud ) संबंधित प्रकरणातील तब्बल 70 लाख मोबाईल क्रमांक बंद करण्यात आलेले आहेत ..
या व्यवहारावर लागेल अधिक चार्ज : आपण जर कार्डद्वारे पेमेंट करु त्यावेळी आपणांकडून विक्रते अधिक चार्ज घेता , त्याचप्रमाणे आता पेमेंट ॲप्स मध्ये असणारी वॉलेट ( Wallet ) मधून शॉपिंग / खरेदीसाठी वापर केल्यास , आपणांकडून विक्रीते अधिक चार्जची मागणी करु शकतील , तर आपण ऑनलाइन खरेदी केल्यास , Extra पैसे आकारले जातील .