Live Marathipeapr संगिता पवार प्रतिनिधी [ Uddhav Thakare Announced Nominees For Loksabha Election 2024 ] : महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले असून , यांमध्ये उद्धव ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळाले असल्याने , उद्धव ठाकरे गटाला मोठा फायदा झाला आहे .
यांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ( शिवसेना ) गटाला लोकसभा निवडणुक 2024 करीता एकुण 22 जागांची उमेदवारी देण्यात आलेली आहे , त्यापैकी ठाकरे गटांने एकूण 17 जागेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे . कोणत्या मतदार संघातून कोणला उमेदवारी मिळाली याबाबत सविस्तर यादी पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | लोकसभा मतदार संघ | उमेदवाराचे नाव |
01. | बुलढाणा | नरेंद्र खेडेकर |
02. | यवतमाळ -वाशिम | संजय देशमुख |
03. | मावळ | संजय वाघेरे -पाटील |
04. | धाराशिव (उस्मानाबाद) | ओमराजे निंबाळकर |
05. | परभणी | संजय जाधव |
06. | मुंबई दक्षिण मध्य | अनिल देसाई |
07. | मुंबई वायव्य | अमोल किर्तीकर |
08. | मुंबई दक्षिण | अरविंद सावंत |
09. | मुंबई ईशान्य | संजय दिना पाटील |
10. | ठाणे | राजन विचारे |
11. | सिंधुदुर्ग – रत्नागिरी | विनायक राऊत |
12. | रायगड | अनंत गीते |
13. | नाशिक | राजाभाऊ वाजे |
14. | शिर्डी | भाऊसाहेब वाघचौरे |
15. | छ.संभाजीनगर | चंद्रकांत खैरे |
16. | हिंगोली | नागेश पाटील आष्टीकर |
17. | सांगली | चंद्रहार पाटील |
तर उद्धव ठाकरे गटांकडून उर्वरित 5 जागाकरीता उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे . ठाकरे गटांस महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा शरद पवार यांनी दिले आहेत . महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी आले असता , मोठा फायदा महाविकास आघाडी सरकारला झाला असता , असे तज्ञांकडून बालले जात आहे .