Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Turi, harabhara , Udid Reached highest Rate News ] : तुरीचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत , तुरीच्या भाव वाढीबरोबर उडीद , हरभरा या डाळवर्गीय पिकांचे भाव आत्तापर्यंतची उच्चांकी दर गाठत आहेत . भाव वाढीमुळे तुर , हरभरा , उडीद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे .
यंदाच्या वर्षी देशांमध्ये तुरीचे उत्पादन घटले आहेत , यामुळे बाजारांमध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे . यंदाच्या वर्षी तुर , उडीद , हरभरा या डाळवर्गीय पिकांचे उत्पादन खुपच कमी झालेले आहेत . यामुळेचे तुर , हरभरा , उडीद या डाळ वर्गीय पिकांचे भाव यंदाच्या वर्षी उच्चांकी भाव गाठत आहेत . काल दिनांक 13 एप्रिल 2024 या दिवशीचे बाजारभाव पाहिले असता , दिसून येईल कि आवक कमी झालेल्या डाळ वर्गीय पिकांचे बाजारभाव उच्चांकी दर गाठले आहेत .
तुर बाजारभाव : तुरीला अमरावती बाजारसमितीमध्ये सर्वाधिक 11700/- रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी भाव मिळाला , तर राज्यात सर्वधारण दर हे प्रति क्विंटल 10,500/- रुपये इतका आहे .
हरभरा बाजारभाव : देसी हरभरा ( मध्यम ) ला राज्यात काल दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी आर्वी बाजारसमितीमध्ये सर्वाधिक 5900/- रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला , तर सदर जातीच्या हरभऱ्याला राज्यात 5500/- रुपये प्रति क्विंटल इतका बाजारभाव मिळत आहे . तसेच हरभरा PKV काबूली ला अमळनेर बाजारसमितीमध्ये सर्वाधिक 8000/- रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला , तर सदर जातिच्या पिकास राज्यात सर्वसाधारण दर हे 7600/- रुपये इतका आहे .
उडीद : उडीदाचे यंदा मोठ्या प्रमाणात उत्पादन घटल्याने , काल दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी पुणे बाजारसमितीमध्ये सर्वाधिक बाजारभाव 9750/- रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे , तर राज्यात सर्वधासारण दर हे 8070/- रुपये प्रति क्विंटल इतका आहे .