Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ TSDPL Sliver Jubilee Scholarship Program 2024-25 ] : TSDPL ( TATA ) रौप्य महोत्सवी शिष्यवृत्ती कार्यक्रम अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना रुपये 50,000/- शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे . याकरीता ऑनलाईन पद्धतीने पात्र विद्यार्थ्यांकडून आवेदन मागविण्यात येत आहेत .
पात्रता : सदर शिष्यवृत्ती करीता विद्यार्थी हे पुणे , चैन्नई , पंतनगर , फरीदाबार , कोलकाता , कलिंगनगर , टाडा या ठिकाणचे रहिवाशी असणे आवश्यक असेल . याशिवाय विद्यार्थी हे फिटर , वेल्डर , सेफ्टी , इलेक्ट्रिकल या सारख्या क्षेत्रांमध्ये सरकारच्या मान्यताप्राप्त संस्थामधून आयटीआय / डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेशित असला पाहीजे .
तसेच सदर विद्यार्थीस इ. 10 वी मध्ये किमान 50 टक्के गुण प्राप्त असणे आवश्यक असेल . याशिवाय विद्यार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे 5,00,000/- पेक्षा अधिक नसावेत . तर विद्यार्थी हा TSDPL अथवा Buddy4study कंपनीतील कर्मचाऱ्यांचे मुले नसावेत .
शिष्यवृत्ती आर्थिक फायदे : पात्र विद्यार्थ्यांस प्रति वर्ष करीता 50,000/- रुपये शिष्यवृत्ती दिली जाते .
आवश्यक कागदपत्रे : दहावी गुणपत्रिका , आधार कार्ड / मतदार ओळखपत्र / वाहन चालविण्याचा परवाना / पॅनकार्ड , चालु वर्षाचे बोनाफाईड , उत्पन्नाचा पुरावा , बँक खाते तपशिल , पासपोर्ट साईज फोटो ..
अर्ज प्रक्रिया : पात्र विद्यार्थ्यांने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Buddy4study.com या संकेतस्थळावर TSDPL Silver Jubilee Scholarship Program 2024-25 यावर क्लिक करुन दि.30.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .