Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Trai new rules see detail ] : दिनांक 01 ऑक्टोंबर 2024 पासुन ट्रायच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्याने , जिओ , एअरटेल , Vi ,BSNL युजर्संना फायदा होणार आहे . याबाबतचे सविस्तर नविन नियमावली पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
सदर सुधारित नियमानुसार , ऑनलाईन पेमेंट करण्याकरीता ओटीटी लिंक तसेच एपीके तसेच युआरएलच्या माध्यमातुन लिंक असणारे संदेश हे त्वरीत ब्लॉक केले जातील . सदर नियम दिनांक 01.10.2024 पासुन लागु करण्यात आलेले आहेत .
सदरचे मॅसेज हे युजर्सच्या सुरक्षतेसाठी फेक कॉल्स तसेच मेसेज यांना आळा घालण्याकरीता लागु करण्यात आलेला आहे , जेणेकरुन नोंदणीकृत नसणाऱ्या कोणत्याही टेलिमार्केट संस्था कडून संदेश अथवा कॉल्स युजर्संना प्राप्त होणार नाहीत .
युजर्सची अनेक माध्यमातुन सध्या हॅकर्सकडून फसवणूक केली जात असते , अश अनेक घटना घडल्या असल्याने , आता ज्या कंपन्या ह्या रजिस्टर नसतील अशा कंपन्यांकडून युजर्संना बॅाक अथवा पेमेंट प्लॅटफॉर्मकरीता ओटीपी संदेश प्राप्त होणार नाहीत . ज्यामध्ये युजर्सचा फायदा असणार आहे . या सुधारित नियमावलीचा बनावट कॉल्स तसेच संदेशपासून करोडो मोबाईल वापरकर्त्यांना दिलासा प्राप्त होणार आहे .
तसेच आता यापुढे एखाद्या क्षेत्रांमध्ये कोणत्या कंपन्याचे नेटवर्क ( Range ) अधिक चांगले आहेत , ते आता युजर्संना समजणार आहे . यामुळे युजर्संना कोणत्या कंपनीचे सिम घ्यावे कळणार आहेत .