Tractor loan : शेतकरी वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासन विविध नाविन्यपूर्ण योजना नेहमीच राबवत आले आहे. या योजनांचा सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा सुद्धा झाला आहे. प्रशासनाने आता शेतकऱ्यांसाठी एक खास योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर भारत सरकार अंतर्गत असणाऱ्या बँकांकडून कर्ज दिले जात आहे. या योजनेप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक ट्रॅक्टर खरेदीवर शेतकऱ्यांना तब्बल 80 टक्के पर्यंत कर्ज देत आहे आणि विशेष भाग म्हणजे हे जे कर्ज आहे त्या कर्जावरील व्याजदर हा खूपच कमी आहे.
ट्रॅक्टरसाठी कोणकोणते शेतकरी कर्ज घेऊ शकतील?
या कर्ज सुविधेचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकेच्या माध्यमातून काही अटी व नियम मांडले गेले आहेत. त्याचे पालन करूनच शेतकऱ्यांची पात्रता ठरवली जाईल आणि पात्र शेतकऱ्यांना सुविधेचा लाभ घेता येईल. जे शेतकरी भारताचे रहिवासी आहेत, यासोबतच ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे सरासरी 10 लाख रुपयांच्या आसपास आहे, यासोबतच शेतकरी मित्रांनो दोन किंवा त्यापेक्षाही अधिक एकर क्षेत्र हे लागवड योग्य आहे (Tractor loan scheme). अशा सर्व शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून कर्ज मिळणार आहे. कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी काही महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे लागतील. त्याविषयी जाणून घेऊया.
भारतातील कमी किंमतीतील टॉप 5 इलेक्ट्रिक कार , जाणुन घ्या किंमती व फिचर्स !
शेतकऱ्यांची प्रगती साधण्यासाठी प्रशासनाचा हातभार;
शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी आणि शेती क्षेत्रात आधुनिक यंत्र सामग्रीचा वापर करून शेतकऱ्यांना प्रगतशील शेतकरी बनवण्यासाठी प्रशासनाने विविध कल्याणकारी योजना राबवण्यावर भर दिला आहे. विशेष भाग म्हणजे कित्येक शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक स्थिती साधली आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड ही शेती क्षेत्रासोबत घातली आहे (Tractor loan interest rate). महत्त्वाचा भाग सांगायचा झाला तर या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत आहे आणि कष्ट कमी होत आहे. तर चला बघूया ट्रॅक्टरच्या कर्ज सुविधा विषयी सविस्तर.
ट्रॅक्टर कर्ज घेण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे;
• ट्रॅक्टर कर्ज घेण्यासाठी अर्ज करत असताना शेतकऱ्याकडे स्वतःचे आधार कार्ड असावे.
• ट्रॅक्टर कर्ज घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे तो शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्या शेतकऱ्याच्या नावावर असलेल्या जमिनीचे कागदपत्रे.
• शेतकऱ्याचे रहिवासी प्रमाणपत्र.
• शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट असणे बंधनकारक आहे.
• यासोबतच शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक त्याच्या आधार कार्ड ची लिंक असलेला असावा आणि हा मोबाईल क्रमांक अर्ज करत असताना त्या ठिकाणी प्रविष्ट करावा.
• अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अर्ज करत असताना करावी लागेल.
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता पगारात होणार चक्क 8 हजार रुपयांची वाढ; पहा सविस्तर;
ट्रॅक्टर कर्ज घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया;
मित्रांनो ट्रॅक्टर कर्ज घेत असताना सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या जवळील बँकेमध्ये जावे लागणार आहे (Tractor loan subsidy). त्या बँकेच्या माध्यमातून ट्रॅक्टर कर्ज घेण्यासाठी कर्ज संबंधित फॉर्म असतो तो घेऊन भरावा लागेल. हा जो फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे नाव, तुमचा पत्ता, आधार कार्ड क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक आणि इत्यादी पुढे विचारलेले संपूर्ण माहिती एकदम अचूक भरावी लागेल (Latest Marathi News). फॉर्म भरल्यानंतर काही महत्त्वाची कागदपत्रे फॉर्म सोबत जोडायची आहेत. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा फॉर्म बँकेमधील अधिकाऱ्यांकडे जमा करावा. पुढे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा फॉर्म तपासून घेतला जातो आणि पुढील कर्ज प्रक्रिया सुरू होते. कर्ज प्रक्रिया पार पडल्यानंतर तुम्हाला बँकेमधून कॉल केला जातो आणि तुम्ही हे कर्ज घेऊन स्वतःचा ट्रॅक्टर घेऊ शकता.