यंदाच्या दहावी / बारावी बोर्ड परीक्षा CCTV निगराणीखाली होणार ; कॉपीमुक्त परीक्षा करीता शिक्षण विभागांकडून निर्णय !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ This year’s 10th/12th board exams will be held under CCTV surveillance. ] : यंदाच्या वर्षी राज्यातील सर्व दहावी / बारावी बोर्ड परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत . कारण राज्य शासनांच्या शिक्षण विभागाकडून दिलेल्या निर्देशानुसार , यंदाच्या बोर्ड परीक्षा ह्या कॉपीमुक्त घेण्यात येणात येणार आहेत .

बोर्ड परीक्षेत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही , याकरीता राज्यातील सर्व बोर्ड परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . परीक्षेचे पेपर हे 24 तास सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणी खाली ठेवयात येणार आहेत , ज्यामुळे पेपरफुटीचे प्रमाण कमी होणार आहेत .

सदर सीसीटीव्ही कॅमेराची फुटेज रेकॉर्ड करण्यात येणार आहे . व सदर फुटेज ही बोर्ड परीक्षा संपुर्ण निकाल लागेपर्यंत जतन करावे लागणार आहेत .तर परीक्षा केंद्रावर लाईटची सोयी नसल्यास , जनरेटरची सुविधा उपलब्ध करण्योचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

याशिवाय परीक्षा केंद्रावरील सहायक परीक्षकांच्या मोबाईलच्या माध्यमातुन प्रत्येक केंद्रावरील हालचाली टिपण्यात येणार आहेत . ज्यामुळे परीक्षेत गैरप्रकार / अनुचित प्रकार टाळले जाणार आहेत .

सदर निर्णयाचे अनेकांकडून स्वागत करण्यात येत आहेत . कारण राज्यांमध्ये मागील काळात परीक्षा काळात अनेक गैरप्रकार पाहायले मिळाले आहेत , यामुळेच बोर्डाकडून सदर महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे .

Leave a Comment