Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ This Year Rain Update News ] : यंदाच्या वर्षी पावसाळा ऋतुमध्ये माहे जुलै आणि ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे . तसेच यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

भारतीय हवामान खात्याने वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार भारतामध्ये केरळ राज्यात प्रथम दिनांक 8 जुन रोजी मान्सुनचे आगमण होणार आहे , तर यंदाच्या वर्षी देशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत . आता हवामान खात्याबरोबरच , पंचांगकर्ते यांनी देखिल आपल्या पंचांगामध्ये यंदाच्या वर्षी जास्त पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टीवरुन 10 जुन पर्यंत राज्यात मान्सूनचा सर्वत्र पाऊस पडेल . यंदाच्या वर्षी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कडक उन्हाळा जाणवत असल्याने , अनेक तलाव , धरणे तसेच विहीरीतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवर झालेले आहेत . यामुळे यंदा पाऊस जास्तच पडेल हे निश्चित आहे .

पंचांग व हवामान खात्याचा मेळ घातला असता , माहे जुलै , ऑगस्ट , सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात सर्वत्र ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे . राज्यात यंदाच्या वर्षी मराठवाडा व विदर्भामध्ये खुप कमी पाऊस झाला होता , यामुळे रब्बी पिकांस मुबलब पाणी मिळाले नाही , सध्या मराठवाडा व विदर्भामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे .

पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितलेल्या पंचाग नुसार येत्या 10 जुन पासून राज्यात मान्सुनची सुरुवात होईल , तर महाराष्ट्र राज्यांमध्ये माहे जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत सर्वाधिक पाऊस पडणार आहे . यामुळे यंदाच्या वर्षी मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *