“या” ज्येष्ठ दिग्गज नेत्यांना पुन्हा मंत्रिमंडळ स्थान दिले नाहीत ; जाणून घ्या कारणे !

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ These “senior veterans  leaders were not given cabinet positions again ] : काल दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी 33 आमदारांनी  कॅबिनेट मंत्र्यांची तर 06 आमदारांनी राज्यमंत्र्यांची  शपथ घेतली . या नवीन मंत्रिमंडळामध्ये राज्यातील काही दिग्गज नेत्यांना पुन्हा स्थान देण्यात आले नाहीत .

01. सुधीर मुनगंटीवार : सुधीर मुनगंटीवार हे सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत , त्यांनी यापूर्वी अर्थ मंत्रालय सांभाळले होते . त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला आहे . असे असताना देखील त्यांना सध्याच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाहीत . सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणुका लढवली त्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला नसल्याचे , पक्षाकडून आरोप आहेत . यामुळेच त्यांना सदर मंत्रिमंडळात स्थान दिले गेले नसल्याचे नमूद करण्यात आले आहेत .

02. छगन भुजबळ : छगन भुजबळ हे अजित पवार गटाकडून आमदार झाले आहेत , त्यांनी मागील सरकार मध्ये मराठा – ओबीसी आरक्षणावरून आपली मोठी भूमिका मांडली होती . यामुळेच मराठा समाज त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज असल्याने , त्यांना सद्यस्थितीत मंत्रिमंडळ स्थान दिले गेले नसल्याचे नमूद करण्यात आले आहेत . तर त्यांना भविष्यात राज्यपाल केले जाईल , असे पक्षाकडून सांगण्यात आले आहेत .

03. रवींद्र चव्हाण : रवींद्र चव्हाण यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते ,  त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पद दिले जाईल अशी चर्चा सुरू आहे . यामुळेच त्यांना मंत्रिमंडळ स्थान दिले गेले नसल्याचे नमूद करण्यात आले आहेत .

याशिवाय विजयकुमार गावित , दीपक केसरकर , अनिल पाटील , तानाजी सावंत , संजय बनसोडे , अब्दुल सत्तार , धर्मरावबाबा आत्राम या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये पुन्हा स्थान देण्यात आलेले नाहीत .

Leave a Comment