Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ These lovely sisters will not get Rs 2100/- but less than Rs 1500/- ] : लाडक्या बहीनींना 1500/- रुपये वरुन 2100/- रुपये देण्याचे आश्वासन महायुती पक्षांकडून देण्यात आले होते . आता सरकार स्थापन हावून महिना झाले तरी याबाबत अधिकृत्त निर्णय घेण्यात आलेला नाही .
परंतु आता काही लाडकी बहीनींना 1500/- रुपयांपेक्षा देखिल कमी रक्कम मिळणार आहे . ज्या लाडक्या बहीनींना इतर सरकारी योजनांचा महाडीबीटी मार्फत लाभ मिळत आहे . अशा महिलांना सदर डीबीटीची रक्कम वजा करुन लाडक्या बहीनींचे रक्कम दिले जाणार आहे .
म्हणजेच ज्या महिला वयोवृद्ध पेन्शन योजना , श्रावणबाळ योजना अशा कोणत्याही दरमहा पेन्शन / रक्कमेचा लाभ घेत आहेत . अशा महिलांना सदर योजना मधून मिळणारी रक्कम वजा करुन लाडक्या बहीनीचे पैसे दिले जाणार आहेत .
याबाबत महिला व बालविकास विभागामार्फत दिनांक 28.06.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार क्रॉस व्हेरिफिकेशन नंतर फरकाची रक्कम लाडकी बहिणींना देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे . म्हणजेच ज्या महिलांना इतर योजनांच्या माध्यमातुन दरमहा 500/- रुपये मिळत असल्यास , लाडकी बहीण योजनातुन सदर रक्कम वजा करुन 1000/- रुपये दिले जाईल .
याबाबत महीला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले आहे .