Live marathipepar संगित पवार प्रतिनिधी [ These 5 reasons why the stock market crashed ] : काल दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारांमध्ये मोठा भुंकप झाला आहे , कारण सेन्सेक्स व निफ्टी अचानक कोसळल्याने , गुंतवणुक दारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहेत . शेअर मार्केट कोसळण्याचे प्रमुख 4 कारणे कोणती आहेत , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
कच्चा तेलाचा परिणाम : अमेरिकेने रशियावर लादलेल्या नव्या निर्बंधामुळे कच्चा तेलाच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालेला आहे . रशियाकडून कच्चा तेलाचा आयातदार असणार भारत हा मोठा ग्राहक आहे . यामुळे कच्चा तेलावरील निर्बंधामुळे तेलाच्या वाढत्या किंमत यामुळेच काल रोजी शेअर बाजारात अचानक घसरण पाहायला मिळाली .
परकीय गुंतवणुकदारांकडून सातत्याने विक्री : परिकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारातुन सातत्याने शेअर विकत आहेत , तर जानेवारी महिन्यांत विदेशी गुंतवणूक दारांनी 21,350 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे . याचा मोठा परिणाम भारतीय शेअर बाजारात होत आहे .
चीन देशाचे नविन आर्थिक धोरण : चीन देशाने नविन आर्थिक धोरण लागु केले आहेत , यामुळे विदेशी गुंतवणूकदार हे भारतापेक्षा चीन देशाला गुंतवणुकीसाठी पहिली पसंती देत आहेत . याचा मोठा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर होताना दिसून येत आहे .
रुपयाची होणारी घसरण : रुपयाची आत्तापर्यंतची निच्चांकी पातळीवर घसरला आहे , रुपयाची किंमत ही डॉलरच्या तुलनेत 86.27/- रुपये पर्यंत स्थिर झाला आहे . यामुळे ही निच्चांक पातळी गाठल्याने , गुंतवणुकदारांवर याचा मोठा परिणाम होतो , यामुळे विदेशी गुंतवणूक दार भारतामध्ये गुंतवणूक करण्यास नापसंती दर्शवतात .