Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ These 11 MLAs of the Shiv Sena Shinde group will be sworn in as ministers ] : राज्याची नवे मुख्यमंत्री (new cm ) म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली आहे . यानंतर आता राज्याच्या नवीन मंत्रिमंडळामध्ये कोणा-कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे .

शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख नेत्याकडून मिळालेल्या माहितीनुसार , 11 आमदारांची मंत्रिपदावर वर्णी लागणार आहे . तर यामध्ये दोन दिग्गज नेत्यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाणार नसल्याचे सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे . यामध्ये राज्यातील बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे दिग्रस मतदारसंघातील संजय राठोड तर दुसरे अब्दुल सत्तार यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार नसल्याची चर्चा सुरू आहे .

या 11 आमदारांना मिळणार मंत्रिपदाची शपथ : प्राप्त माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील, उदय सामंत , दादा भुसे , तानाजी सावंत , शंभूराजे देसाई , दीपक केसरकर , संजय शिरसाट,  भरतशेठ गोगावले , प्रताप सरनाईक , अर्जुन खोतकर , विजय शिवतारे यांची मंत्रीपदावर वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे .

तर दुसरीकडे अजित पवार गटाला 7-8 मंत्री पदे मिळतील , उर्वरित पदे भारतीय जनता पार्टीकडे (BJP ) राहणार आहेत . तर प्रमुख खाते यामध्ये गृह खाते , महसूल खाते करिता एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *