Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ These 10 items that will provide relief to farmers will be included in the Budget 2025-26 ] : शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या 10 बाबींचा समावेश येत्या 2025-26 च्या अर्थसंकल्पात करण्याची शिफारस अर्थमंत्र्यांकडे आलेल्या आहेत . सदर 10 बाबी पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पीएम किसान योजना ( PM Kisan yojana ) : प्रधानमंत्री किसान योजना अंतर्गत रक्कम वाढविण्याची शिफारस अर्थमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे . यांमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांना 6000/- देण्यात येते , यांमध्ये आणखीण 6000/- रुपये म्हणजेच प्रतिवर्षी 12,000/- रुपये देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे .
किसान क्रेडीट कार्ड : किसान क्रेडिट कार्ड योजना अंतर्गत अल्प मुदतीचे कर्ज दिले जाते , यांमध्ये अल्प / दिर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करुन देण्याची सुधारित नियमांची शिफारशी करण्यात आलेली आहे . जेणेकरुन शेतकऱ्यांना सहज / सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध होईल ..
वयोवृद्ध शेतकऱ्यांना विना सहयोगी पेन्शन : आज रोजी वयोवृद्ध शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे सामाजिक सुरक्षा मिळत नाही , याकरीता वय वर्षे 60 पेक्षा अधिक असणाऱ्या शेतकऱ्यांना दरमहा किमान 3,000/- रुपये विना सहयोगी पेन्शन देण्यात यावी अशी शिफारस करण्यात आलेली आहे .
- शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कायदेशिर हमी मिळावी , याकरीता तरतुदीची शिफारस .
- दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारे दूध दर निश्चित करणेबाबत , शिफारस .
- खत अनुदान शेतकऱ्यांनाच मिळतील अशा पद्धतीने नियोजनाची शिफारस .
- प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत तीन भागधारकांद्वारे विम्याचा हप्ता भरण्याऐवजी एकाच भागाद्वारे विमा हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध करण्याची शिफारस .
- निर्यातीवर बंदी घालून , कृषी उत्पन्न साठा मर्यादा लादून चलनवाढीचे धोरण याकरीता कायमची सोडचिठ्ठी देण्याची शिफारस .
- पिकांची साठवणूक , कृषी शिक्षण , पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय याबाबत अर्थसंकल्पात विशेष तरतुदीची शिफारस .
- सरसकट कर्जमाफीची शिफारस .