राज्यात दि.27 ते 28 डिसेंबर दरम्यानच्या काळात मेघगर्जना सह पावसाची मोठी शक्यता ; अधिकृत्त वृत्त !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ There is a high possibility of thundershowers in the state between December 27th and 28th ]: राज्यांमध्ये दिनांक 27 ते 28 डिसेंबर 2024 दरम्यानच्या काळांमध्ये मेघ गर्जनासह पावसाची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

या संदर्भात राज्य शासनांच्या महासंवाद या अधिकृत्त संकेतस्थळावरुन माहिती देण्यात आलेली आहे . सदर वृत्तानुसार , नमुद करण्यात आले आहेत कि , दि.26 डिसेंबर रोजी राज्यांमध्ये सोलापुर , सांगली , कोल्हापुर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

तर दिनांक 27 डिसेंबर रोजी राज्यात नाशिक विभाग , मध्य महाराष्ट्र ( पुणे विभाग ) तर उत्तर मराठवाडा व पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी पावसाची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .

याशिवाय दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी राज्यात मराठवाडा , खान्देश व विदर्भातील काही भागांमध्ये मेघगर्जनासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यामुळे शेतकऱ्यांनी शेती करीता कृषी सल्ला व यापुढील हवामान अंदाजाकडे लक्ष ठेवण्याचे आव्हान करण्यात आलेले आहेत .

यामुळे शेतकऱ्यांना दिनांक 27 व 28 डिसेंबर या काळांमध्ये शेतीमालाकडे अधिक लक्ष देणे आवाश्यक आहे .

Leave a Comment