Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ The river linking project will benefit 03 districts in Western Maharashtra and 06 districts in Marathwada. ] : महायुती सरकारचा सुरु असलेला महत्वपुर्ण नदीजोड प्रकल्पाचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील 03 जिल्ह्यांना तर महाराठवाड्यातील 06 जिल्ह्यांना होणार आहे .

नद्याजोड प्रकल्पाचा मुख्य उद्देश : नद्याजोड प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे , अथवा शेतीच्या सिंचनासाठी आवश्यक पाणीपुरवठा नाही . अशा भागामध्ये ज्या भागात नद्यांना मुबलक पाणी आहे , अथवा नद्यांना पुर येते , अशा नदींचे पाणी कमी पाण्याच्या नदींमध्ये वळवणे . जेणेकरुन सर्व ठिकाणी शेतीच्या सिंचनासाठी पाणी मुबलक प्रमाणात मिळेल .

नदीजोड प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधीची तरतुद करण्यात आलेली आहे , यांमध्ये गोदावरी खोऱ्याकरीता 40000 कोटी रुपये तर विदर्भाकरीता 01 लाख कोटी रुप्ये खर्च करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे .

यांमध्ये नारपार प्रकल्प अंतर्गत नाशिक , जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील भागांना मोठा फायदा होणार आहे . ज्यांमध्ये नाशिक , जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील ज्या भागात पाण्याची कमतरता आहे , त्या भागाकडे पाण्याची वळती करण्यात येत आहे .

तर सदर नदीजोड प्रकल्प अंतर्गत गोदावरी व उपनद्यांचे दुष्काळी भागांमध्ये वळती करण्यात येणार आहे . याचा लाभ लातुर , धाराशिव , परभणी , हिंगोली , बीड , नांदेड या 06 जिल्ह्यांना लाभ मिळणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *