Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ The installment of Ladki Bhaeen Yojana will be credited to the account by January 26th. ] : लाडकी बहीण योजनेचा राहीलेला हप्ता दिनांक 26 जानेवारी 2025 पर्यंत महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाईल , अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे .

पत्रकारांशी संवाद साधताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल दिनांक 16 जानेवारी रोजी मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर सांगितले कि , लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता हा दिनांक 26 जानेवारी 2025 पर्यंत बहीणींच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे .

तसेच ज्या महिला सदर योजनेकरीता पात्र ठरलेल्या आहेत , अशा महिला लाभार्थ्यांना माहे जुलै महिन्यांपासून लाभ वितरीत केला जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे . तर पुढील हप्ता हा दिनांक 26 जानेवारी पर्यंत महिलांच्या बँक खात्यात डी.बी.टी द्वारे हस्तांतरित केला जाणार आहे .

सदर पुढील हप्ता अदा करण्यासाठी राज्य सरकारकडून तब्बल 3,690/- कोटी इतकी रक्कम वितरणास मंजूरी देण्यात आलेली आहे . यामुळे पुढील हप्ता विहीत वेळेत अदा होणार आहे .

तर नव्याने अर्ज सादर करणेबाबत , मंत्री महोदयांनी कोणतेही वक्तव्य केले नाहीत , यामुळे नव्याने अर्ज तुर्तास तरी स्विकारण्यात येणार नाहीत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *