केंद्र व राज्य सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पात “या” महत्वपुर्ण तरतुदीच्या शिफारशी !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ The central and state governments have recommended this important provision in the budget for government employees. ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी येत्या अर्थसंकल्पांमध्ये केंद्र व राज्य सरकारकडून विशेष तरतुद करण्यात यावी याकरीता कर्मचाऱ्यांकडून निवेदने देण्यात आलेले आहेत .

केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी या 02 महत्वपुर्ण तरतुदी : केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांकरीता नविन वेतन आयोग करीता विशेष तरतुद करण्याच्या शिफारशी केंद्रीय वित्त विभागाला प्राप्त झालेल्या आहेत . सन 2026 मध्ये आठवा वेतन आयोग नियोजित असल्याने , आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्याची तरतुद येत्या केंद्रीय अर्थसंकल्पांमध्ये करण्यात येईल , अशी मोठी शक्यता आहे .

महागाई भत्ता मध्ये 4 टक्क्यांची वाढ : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये दि.01.01.2025 पासुन परत 03 ते 04 टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहेत , याबाबतचा अधिकृत्त निर्णय केंद्रीय अर्थसंकल्पांमध्ये तरतुद करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे .

राज्य कर्मचाऱ्यांकरीता अर्थसंकल्पांमध्ये विशेष तरतुद : राज्य कर्मचाऱ्यांसाठी येत्या राज्याच्या अर्थसंकल्पांमध्ये वेतनत्रुटी निवारण समितीचा अहवालास मंजूरी दिली जाणार असल्याची शक्यता आहे , ज्यामुळे ज्या पदांच्या वेतनांमध्ये 7 व्या वेतन आयोगानुसार त्रुटी आढळून आलेल्या होत्या , अशा पदांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत विशेष तरतुद केली जाईल .

कर्मचाऱ्यांकडून आठवा वेतन आयोगाबाबत , विशेष तरतुदीची मागणी असल्याने , याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत्त निर्णय घेण्याची शक्यता आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment