Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Thakit Payment , Installment , Medical Bill etc. ] : राज्यातील सर्व आस्थापनेवरील बदली झालेल्या कर्मचाऱ्यांचे विविध थकित देयके अदा करणेसाठी आदेशित करणेबाबत राज्य शासनांच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय , पुणे कार्यालयामार्फत दिनांक 08 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व विविध महानगरपालिका / नगरपालिका /नगरपरिषद/ कटक मंडळे येथून एकतर्फी पती-पत्नी एकत्रीकरणातून आंतरजिल्हा बदलीने महानगरपालिका/ नगरपालिका/ नगरपरिषद/ कटक मंडळे क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांचे थकीत वेतन देयके , सातव्या वेतन आयोगाचे हप्ते , वैद्यकीय देयके , वरिष्ठ / निवड श्रेणी फरक ,रजावेतन व इतर थकीत देयके अदा करण्यासाठी आदेशित करण्यात आले आहेत .
यानुसार नियमित थकीत वेतन देयक , इतर थकीत वेतन ( यामध्ये वरिष्ठ वेतनश्रेणी , महागाई भत्ता , रजावेतन ) , तसेच सातव्या वेतन आयोगाचे (पहिला दुसरा तिसरा व चौथा) हप्ता त्याचबरोबर वैद्यकीय देयके व इतर थकीत देयके अदा अदा करण्याची निर्देश देण्यात आली आहेत .
याबाबत महाराष्ट्र राज्य महानगरपालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ यांचे राज्याध्यक्ष यांनी दिनांक 22 मार्च 2024 रोजी दिलेल्या पत्रानुसार , सदर कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक प्राथमिक यांच्याकडून राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देण्यात आले आहेत .
या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालकमार्फत दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.