Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ teaching & Non Teaching staff nps nirnay ] : राज्यातील अनुदानित , विमुक्त जाती , भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शाळांमधील कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन ( NPS ) योजना लागु करणेबाबत , इ.मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत दिनांक 27.09.2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन ( DCPS ) लागु असणाऱ्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या शासन अनुदानित विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागास वर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गाच्या असणाऱ्या प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा तसेच विद्या निकेतन शाळांमधील कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सदर निर्णयानुसार लागु करण्यात येत आहेत .
यांमध्ये शासन अनुदानित विमुक्त जाती , इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा तसेच भटक्या जमाती , विद्यानिकेतर त्याचबरोबर उसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा / निवासी शाळांतील दिनांक 01 जानेवारी 2024 पुर्वी नियुक्त झालेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या बाबतीत कार्यपद्धती सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेल्या आहेत .
तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनातुन कपात करण्यात आलेली अंशदान व नियोक्त्यांचे अशंदान व रकमा विश्वस्त बँकेकडे वर्ग करणे , मासिक अंशदानाची वसुली , सेवाशुल्क , ताळमेळ , संकीर्ण सुचना या संदर्भातील सर्व माहिती पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर शासन निर्णय पाहावा …
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.