Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Teacher Transefer Shasan Paripatrak ] : शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपुर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत , शिक्षण विभाग ( प्राथ ) जिल्हा परिषद अमरावती कार्यालयामार्फत दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या परिपत्रकानुसार , जिल्हांतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पुर्वीपासून कार्यरत आहेत , त्यांच्यापैकी इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार जागा रिक्त असल्यास , समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देणेबाबत नमुद करण्यात आलेले आहेत . त्यानुसार शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 21.06.2023 तसेच मा.उप सचिव यांच्या दिनांक 06.03.2024 व दिनांक 11.03.2024 रोजीच्या संदर्भिय पत्रानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
मेळघाट क्षेत्रांमध्ये शिक्षकांच्या बऱ्याच जागा ह्या रिक्त असल्यामुळे प्रथम मेळघाटमधील रिक्त जागा भरणे क्रमप्राप्त असून , त्यानुसार जिल्हा अंतर्गत बदलीकरीता कार्यरत शिक्षकांपैकी इच्छूक शिक्षकांना मेळघाटमध्ये बदलीने पदस्थापना पाहिजे असल्यास अशा शिक्षकांचे अर्ज संकलित करुन त्यांची एकत्रित यादीसह अर्ज कार्यालयांमध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
त्याचबरोबर दिनांक 31 मार्च 2024 अखेर शिक्षकांची शाळा निहाय / पटसंख्यानिहाय मंजूर / कार्यरत रिक्त / अतिरिक्त पदांची अचूक माहिती पत्रासोबत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भात शिक्षण विभाग ( प्राथ ) जिल्हा परिषद , अमरावती कार्यालय मार्फत दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.