Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ teacher senior pay scale paripatrak ] : शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणी त्रुटी बाबत , ग्राम विकास विभागांकडून दिनांक 27 जुन 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्य वेतन त्रुटी निवारण समिती 2024 कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठकीस उपस्थित राहण्याबाबत , महाराष्ट्र राज्य वेतन त्रुटी कृती समिती तसेच अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती धंतोली वर्धा जिल्हा वर्धा यांच्याप्रति ग्राम विकास विभागाच्या उप सचिव यांच्यामार्फत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार , राज्यातील वेतन त्रुटी निवारण समिती 2024 कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने अध्यक्ष , वेतन त्रुटी निवारण समिती यांच्यासोबत विभाग प्रमुख व अधिकारी / कर्मचारी संघटना यांच्या बैठकीबाबतचे सुधारित वेळापत्रक देण्यात आले आहेत . सदरच्या बैठकीकरीता ग्राम विकास विभागास दिनांक 02 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते 1 अशी वेळ देण्यात आलेली आहे .
7 व्या वेतन आयोगांमध्ये जिल्हा परिषंदामधील प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत निर्माण होणारी त्रुटी दुर करण्याबाबत मा.उच्च न्यायालय , खंडपीठ मुंबई , औरंगाबाद व नागपुर येथे रिट याचिका दाखल करण्यात आल्या आहेत . राज्य वेतन त्रुटी निवारण समिती 2024 समोर सादरीकरण करण्यासाठी पुढील प्रतिनिधी यांना सुनावणीकरीता संधी मिळणेबाबत महाराष्ट्र राज्य वेतन त्रुटी कृती समिती यांनी ई-मेलद्वारे कळविण्यात आलेले आहेत .
यांमध्ये महेश संदरराव देशमुख , संतोष सिताराम वारंग , राजेश भास्कर दुर्गूडे , विक्रम भिकाजी वागरे या प्रतिनिधींना संधी देण्यात आलेली आहे . सदर बैठकीच्या वेळी प्रस्तावांच्या अनुषंगाने आपले म्हणणे समिच्या समोर मांडण्याकरीता आपल्या स्तरावर योग्य त्या माहितीसह दिनांक 02.08.2024 रोजी सकाळी 11.00 ते 1.00 वाजता मंत्रालय विस्तार इमार दुसरा मजला येथे हजर रहाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
या संदर्भातील सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..