पवित्र पोर्टल टप्पा – 1 मध्ये अपात्र , गैरहजर , माजी सैनिक व 10% कपात यांना दुसऱ्या टप्यांमध्ये समाविष्ट करुन घेणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.27.12.2024

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Teacher Recruitment Pavitra portal ] : पवित्र पोर्टल माध्यमातुन टप्पा – 1 मध्ये गैरहजर , अपात्र तसेच माजी सैनिक व 10 टक्के कपात ही बाकी राहीलेली सर्व जागा दुसऱ्या टप्यांमध्ये समाविष्ट करुन घेणेबाबत दिनांक 27.12.2024 रोजी शालेय शिक्षण व क्रिडा विभागांमध्ये महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .

सदरचे शासन परिपत्रक हे श्रीम.मधुबाला महेंद्रकुमार यादव , युवा विद्यार्थी असोसिएशन , महाराष्ट्र राज्य यांचे दि.20.11.2024 व सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांक एसआरव्ही – 2024 / प्र.क्र.39 /का.12 ( सेवा ) दि.20.12.2024 अशा दोन्ही संदर्भाधीन पत्रानुसार सदरचे परिपत्रक सादर करण्यात आले आहेत .

यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सन 2022 च्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या अपात्र , गैरहजर , माजी सैनिक व दहा टक्के कपात ही बाकी राहीलेली सर्व जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार असून , दिनांक 23.10.2023 पर्यंत पहिल्या टप्प्यातील वयास पात्र ( कोरोना काळातील 02 वर्षांची शिथिलता सोबत ) असलेले अभियोग्यता धारकांना दुसऱ्या टप्यांमध्ये समाविष्ट करुन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत ..

सदरच्या प्रकरणी यांमध्ये नमुद निवेदनानुसार मागणीच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 20.12.2024 च्या शासन निर्णयातील तरतूदी विचारात घेवून स्वयंस्पष्ट अभिप्राय शासनांस तात्काळ सादर करण्याचे निर्देश कक्ष अधिकारी यांच्याकडून आयुक्त ( शिक्षण ) महाराष्ट्र राज्य पुणे यांना देण्यात आले आहेत .

Leave a Comment