Spread the love

Live Marathipepar , संगिता पवार , प्रतिनिधी [ Teacher Payment Scale Increase ] : शिक्षकांच्या बाबतीत पदोन्नतीनंतर वेतनोन्नतीबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 25 ऑक्टोंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

शिक्षकांच्या पदविधर प्रशिक्षित शिक्षकांच्या वेतोन्नती संदर्भात शिक्षण संचालक ( प्राथमिक ) , महाराष्ट्र राज्य पुणे ( शिक्षण संचालक ( प्राथमिक ) महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दिनांक 06.10.2023 रोजीचे पत्राच्या संदर्भानुसार )  यांना कक्ष अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत पुढीलप्रमाणे वेतनोन्नतीबाबत सुचना निर्गमित करण्यात आलेले आहेत .

या परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , प्रशिक्षित पदवीधर वेतोन्नती देण्यात येणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती दिनांक 13 फेब्रुवारी 2013 पुर्वीची असल्यास सदरची वेतोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) ची अट शिथिल करण्या बाबतची धारणा पक्की करण्यात येत आहेत .

परंतु अशा प्रशिक्षित शिक्षकांना पदोन्नती / वेनोन्नती घेताना राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेने त्या पदाकरीता विहीत शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) वगळता पुर्ण केलेली असणे बंधनकारक असून , याचे पालन होईल याबाबत दक्षता घेण्याचे शिक्षण संचालक ( प्राथमिक ) महाराष्ट्र राज्य पुणे यांना सदर परिपत्रकान्वये सुचित करण्यात आलेले आहेत .

सदर पदोन्नती नंतर वेतोन्नती बाबतचा दिनांक 25.10.2023 रोजीचा सविस्तर शासन परिपत्रक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *