Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ teacher prakshikshan program letter ] : राज्यातील नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण बाबत , दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग कडून निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या परिपत्रकानुसार राज्यातील नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रेरण कार्यक्रम आयोजित करणे अपेक्षित आहे , याकरिता नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर सात दिवस प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत दिनांक 04 नोव्हेंबर 2024 ते दिनांक 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आली आहेत .

यामध्ये नमूद करण्यात आली आहे , की इयत्ता पहिली ते आठवी व इयत्ता नववी ते बारावी साठी नवनियुक्त शिक्षकांचे सात दिवसांचे प्रशिक्षण नियोजित करण्याचे निर्देश देण्यात आली आहेत . त्याचबरोबर पहिले 06 दिवस इयत्ता पहिली ते आठवी व इयत्ता नववी ते बारावी ला शिकवणाऱ्या शिक्षकांची समान घटकांचे एकत्रित प्रशिक्षण घेण्याचे तसेच सातवा दिवस हा स्वतंत्र घटकांसाठी राहील असे नमूद करण्यात आली आहेत .

त्याचबरोबर वेळापत्रकाची सॉफ्ट कॉपी सदर पत्रासोबत जोडण्यात आलेली आहे , सदरच्या प्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध करून दिली जाणार आहे . तसेच वर्ग संख्येनुसार , आवश्यक सुलभकांची  निवड करण्यात येणार आहे .

सदर परिपत्रकानुसार राज्यातील 100% नवीन नियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होईल , याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण अधिकारी यांची राहणार आहे . याबाबतचे परिपत्रक डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावेत .

प्रशिक्षण परिपत्रक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *