Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Teacher / non Teaching Staff Samayojan Shasan Nirnay ] : राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित / अंशत : अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत , अनुसरावयाची सुधारित कार्यपद्धती बाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 15 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यातील जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणालीच्या अनुषंगाने राज्यात शिक्षक विद्यार्थी गुणोत्तर प्रमाण पुरेसे आहे , तसेच संचमान्यता / पटपडताळणीमुळे विद्यार्थी संख्या कमी होणे अथवा वर्ग तुकड्या बंद पडणे , शाळेची मान्यता काढून घेणे या कारणास्तव जे शिक्षक अतिरिक्त ठरत असतील अशा शिक्षकांचे महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी 1981 मधील नियम 26 नुसार अनुदानित खाजगी प्राथमिक / उच्च प्राथमिक / माध्यमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे त्वरीत अन्य ठिकाणी समायोजन होणे अनिवार्य आहे ..
याकरीता राज्यातील खाजगी अनुदातिन / अशंत : अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालय मधील स्थानिक संस्थाच्या शाळेतील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समायोजन करताना सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेली कार्यपद्धतीचे अनुपालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार प्रथम नियुक्ती प्राधिकारी यांनी दरवर्षी माहे सप्टेंबर 30 अखेरचा पट ( आधार वैधता ) विचारात घेवून संच मान्यता 15 ऑक्टोंबर पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश आहेत . तसेच दरवर्षी दि.16 ऑक्टोंबर ते दि.31 ऑक्टोंबर दरम्यान नियुक्ती प्राधिकारी यांनी आपल्या सर्व शाळांमधील रिक्त पदांची यादी तसेच अतिरिक्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची यादी संकेतस्थळावर प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करताना त्यांच्या मूळ वेतनास संरक्षण असणार आहेत , मात्र अन्य भत्यांच्या बाबतीत त्या – त्या क्षेत्राकरीता राज्य शासनाने लागू केलेले भत्ते त्यांना विहीत अनुज्ञेय असणार आहेत . यांमध्ये टप्पा अनुदावरील समान टप्यावर शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे समायोजन झाल्याच्या नंतरही अतिरिक्त असल्यास 20 टक्के चे प्रथम 40 टक्के चे 60 टक्के , 60 टक्के चे 80 टक्के वर , 80 टक्के चे 100 टक्के वर या क्रमाने समायोजन करता येणार आहेत .
समायोजन करणेबाबत विविध अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक असणार आहेत , या बाबत सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.