Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Teacher Mahabharati Update News ] : राज्यांमध्ये शिक्षक या पदांच्या महाभरती प्रक्रिया बाबत , आत्ताची मोठी अपडेट समोर येत असून , राज्यांत तब्बल 22,000 शिक्षक पदांच्या यापैकी खासगी यंत्रणेच्या तब्बल 9,000 पदांकरीता महाभरती प्रक्रिया करीता पुढच्या आठवड्यांपासून प्राधान्यक्रमाची सुरुवात होणार असल्याची मोठी आनंदाची बातमी येत आहेत .
महाराष्ट्र राज्यातील शासकीय यंत्रणा बरोबरच खासगी अनुदानित शाळांमधील रिक्त पदांवर देखिल पवित्र पोर्टलवर पदभरती करण्यास दिनांक 02 फेब्रुवारी 2024 वार शुक्रवार पर्यंत मुदत देण्यात आलेली होती . या रिक्त पदांवर पहिल्या टप्यात तब्बल 22,000 शिक्षक पदांची भरती होणार आहे , यामध्ये राज्यातील अनुदानित शाळांमधील 9,000 रिक्त जागांचा समावेश आहे तर उर्वरित 13 हजार पदे ही जिल्हा परिषदांसह , महानगरपालिका , नगरपालिकांच्या शाळांमधील रिक्त पदांवर पदभरती होणार आहे .
राज्यातील जिल्हा परिषदांसह खासगी अनुदानित शाळांचा विचार केला असता तब्बल 67,000 हजार पर्यंत शिक्षक पदे रिक्त आहेत . सदर रिक्त पदांपैकी पहिल्या टप्यात 22,000 पदांवर पदभरती राबविण्यात येत आहे . यापैकी जिल्हा परिषदा मधील शाळेमधील रिक्त पदांपैकी 70 टक्के तर खासगी अनुदानित शाळेतील रिक्त जागेपैकी 80 टक्के रिक्त पदांवर पदभरती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
सदरची पदभरती प्रक्रिया ही पवित्र पोर्टलद्वार करण्यात येत आहेत . यापैकी खासगी अनुदानित शाळांमधील पदभरती करीता एका जागेकरीता 3 उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे . तर राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांवरील शिक्षक पदांची निवड ही गुणवत्तेनुसार थेट पदभरती करण्यात येणार आहेत .
प्राधान्यक्रमाला मंगळवार नंतर सुरुवात : जिल्हा परिषद शाळांमधील पदभरती करीता इच्छुकता करीता कितीही जिल्हा परिषदांचा पर्याय देता येणार आहेत , सदर प्राध्यान्यक्रम भरण्यास उमेदवारांना दिनांक 06 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे . फेब्रुवारी अखेर सदर पदभरती प्रक्रिया संपविण्याचा दृष्टीने हे नियोजन करण्यात आलेले आहेत .