Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ teacher extra post samayojan ] : शिक्षकांची वाढीव पदे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेली आहे . सदर परिपत्रकानुसार , नमुद करण्यात आलेली आहेत कि , शासन निर्णय 07 मार्च 2024 नुसार प्रपत्र क मधील 53 शिक्षकांचे समायोजनाने समुपदेशन करण्यासाठी दि.30.07.2024 रोजीचे आदेश निर्गमित केले आहेत .
त्यानुसार 24 शिक्षकांचे समायोजन झाले , उर्वरित 29 शिक्षकांचे समायोजन दि.10.10.2024 रोजी 11.00 वाजेपर्यंत राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण , महाराष्ट्र राज्य पुणे मधील महात्मा फुले सभागृह येथे उपस्थित राहणेबाबत संबंधितास आपल्या स्तरावरुन कळविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सबब शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या कार्यालयातील सहा शिक्षण संचालक व सहा शिक्षण उप निरीक्षक तसेच संबंधित लिपिक यांना सर्व अद्यावत माहिती समक्ष घेवून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे येथे दिनांक 10 ऑक्टोंबर 2024 रोजी 11.00 वाजेपर्यंत ..
उपस्थित राहाण्याचे व समायोजन प्रक्रियेमध्ये आपल्यामूळे तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास , याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षण उपसंचालक यांची राहील याची नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
या संदर्भातील सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे जाणून घेवू शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.