Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Teacher Appointment after retirement paripatrak ] : राज्य शासनांच्या शालेय व क्रिडा विभागांकडून दिनांक 15 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार राज्यातील रिक्त पदी सेवानिवृत्त शिक्षकांची / पात्र उमेदवारांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे .

सदर परिपत्रकानुसार नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नयेत यास्तव शासन पत्र दिनांक 07 जुलै 2023 अन्वये सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या कालावधी साठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

तदनंतर सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी 2022 नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र 1544 उमेदवारांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यापुर्वी तात्पुरत्या कालावधीकरीता मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तदनंतरही पदे रिक्त राहील्यास , अनुसुचित प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची जाहीरातीद्वारे अर्ज मागविवून तात्पुरत्या कालावधी करीता कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच शासन पत्र दिनांक 07 जुलै 2023 नुसार कंत्राटी तत्वावर नियुक्त सेवानिवृत्त शिक्षकांना देण्यात येणारे रुपये 20,000/- एवढे मानधन पेसा क्षेत्रातील कंत्राटी पद्धतीने नियुक्त शिक्षकांना देखिल देय राहील असे नमुद करण्यात आलेले आहेत .

या संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 15 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *