Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Tata Punch EV Launch ] : भारतामध्येच नव्हे तर जगांमध्ये टाटा पंचने सर्वात जास्त लोकप्रियता मिळविली आहे . टाटा पंच ही सेफ्टीच्या बाबतीत 5 स्टार ग्लोबर रेंटिग असणार सर्वात कमी किंमतीमधी स्मॉल एसईव्ही कार आहे . आता टाटाने ही कार इलेक्ट्रीक व्हेरिएंट मध्ये लाँच केलेली आहे .

दिनांक 05 जानेवारी रोजी टाटा कंपनीने टाटा पंच EV लाँच केलेली आहे , पंच मध्ये प्रथमच ही इलेक्ट्रिक कार लाँच करण्यात आलेली असून , यांमध्ये एकुण 5 व्हेरिएंट लाँच करण्यात आलेले आहेत . टाटा कंपनीच्या सुरक्षितेचा विचार केला असता , ही कार सर्वात सुरक्षित कार असून एअर बॅग लगेच ओपन होतात .

व्हेरिएंट नुसार एका सिंगल चार्ज मध्ये 300 ते 600 किलोमीटर पर्यंत चालते तर 10 मिनिटांमध्ये ही कार 100 किलोमीटर पर्यंत धावते . या कारची खास वैशिष्ट्ये म्हणजे इतर EV कारपेक्षा उत्तम बॅटरीचा वापर यांमध्ये करण्यात आलेला आहे . याला चार्ज करण्याकरीता 7.2kw ते 11.kw पर्यंतच्या एसी चार्जिंग बोर्डाचा वापर करुन चार्जिंग करता येणार आहेत .

21,000/- रुपये देवून करु शकता बुकिंग : ही कार दिनांक 05 जानेवारी रोजी लाँच करण्यात आलेली आहे , लाँच केलेल्या दिवशीच या कारची बुकिंग सुरु करण्यात आलेली आहे . या कारची किंमत व्हेरिएंट नुसार 9.20 लाख रुपये तर 12.50 लाख रुपये इतकी असणार आहे .

अनेक जण टाटापंचच्या EV व्हेरिएंटची वाट पाहत होते , यामुळे पंच इव्हीच्या बुकिंग मोठ्या प्रमाणात होत आहेत . ही बुकिंग टाटाच्या ऑनलाईन संकेतस्थळावरुन देखिल करु शकता किंवा शोअरुमला भेट देवून बुकिंग करु शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *